मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /कोरोना काळात मुंबईत 'मुन्नाभाई MBBS' चा सुळसुळाट; पोलिसांनी आवळल्या पाच बोगस डॉक्टरांच्या मुसक्या

कोरोना काळात मुंबईत 'मुन्नाभाई MBBS' चा सुळसुळाट; पोलिसांनी आवळल्या पाच बोगस डॉक्टरांच्या मुसक्या

Munna Bhai MBBS type fake doctors arrested by Mumbai Police: मुंबई पोलिसांनी पाच बनावट डॉक्टरांना बेड्या ठोकल्या आहेत.

Munna Bhai MBBS type fake doctors arrested by Mumbai Police: मुंबई पोलिसांनी पाच बनावट डॉक्टरांना बेड्या ठोकल्या आहेत.

Munna Bhai MBBS type fake doctors arrested by Mumbai Police: मुंबई पोलिसांनी पाच बनावट डॉक्टरांना बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई, 19 ऑगस्ट : सध्या करोनाच्या (Corona) काळात साधी शिंका देखील आली की टेंशन येते. पण योग्य उपचार मिळाले तर करोना होण्यापासून आपला बचाव होवू शकतो. एकतर करोनामुळे डाॅक्टरकडे जायला भीती वाटायची पण हिंमत करुन नागरिक आता डाॅक्टरकडे जातात आणि उपतार घेतात. पण या काळातही टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांची कमी नाहीये. कोणतेही सर्टिफिकेट, डाॅक्टरची पदवी, कोणताही वैद्यकीय उपचाराचा अनुभव नसतानाही बोगस पदवींच्या आधारे बोगस डाॅक्टरगिरी (Fake doctors) केली जातेये. धक्कादायक म्हणजे ते ही मुंबई सारख्या शहरात ही बोगस डाॅक्टरगिरी सुरु असल्याचं समोर आलं आहे. या बोगस डाॅक्टरगिरीचा पर्दाफाश करत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 5 मुन्नाभाई MBBS च्या मुसक्या आवळल्या (Police arrested Munna Bhai MBBS type fake doctors) आहेत.

मुंबईतील शिवाजीनगर आणि गोवंडी भागातून या 5 बोगस डाॅक्टरांना अटक करण्यात आली आहे. सतत गजबजलेल्या अशा शिवाजीनगर तसेच गोवंडी भागात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातच करोनामुळे कंबरडे मोडल्याने आर्थिक चणचण असलेल्या लोकांच्या मजबूरीचा फायदा घेवून हे 5 मुन्ना भाई MBBS कोरोना बाधित रुग्णांवर देखील उपाचर करत होते की काय असा संशय मुंबई पोलिसांना आहे. कारण कोरोना रुग्णांवर उपचार करण्याकरता वापरली जाणारे औषधे अँन्टीबायोटिक टॅबलेट्स, सर्जिकल टे, पॅरसिटॉमॉल डेक्झा टॅबलेट्स, टोरमॉक्झान 500 एम.जी, सिरिन्स सलायन बॉटल्स्‌, अन्टॉसिड्स टॅबलेट, बायेमेडीकल वेस्ट मटेरियल, रॅन्टीडाईनहायड़ोक्लोराइड इंजेक्शन ही औषधे पोलिसांनी या बोगस डाॅक्टरांकडून जप्त केली आहेत. यातील एक तरी औषध कमी जास्त दिले गेले तर रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. याकरता वैद्यकीय शिक्षण गरजेचे असते. पण या 5 बोगस डाॅक्टरांकडे कोणताही वैद्यकीय परवाना नसतानाही या 5 बोगस डाॅक्टरांचा हा जिवघेणा खेळ गेली काही वर्षे सुरुच होता.

मुंबई पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली आणि माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यविभागाच्या मदतीने या 5 बोगस डाॅक्टरांच्या क्लिनकवर धाड टाकली. त्यावेळेस या 5 बोगस डॉक्टरांकडे कोणताही अधिकृत वैद्यकिय परवाना नसताना तसेच महाराष्ट मेडीकल कौन्सिलमध्ये नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचे भासवुन बेकायदेशिररित्या विविध आजारावरील रूग्णांना औषधे इंजेक्शन देत औषधेपचार करताना पोलिसांनी यांना रंगेहाथ पकडले.

वरिल बोगस डॉक्टरांविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून बोगस डॉक्टरांना पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई मुंबई क्राईम ब्रांच युनिट 6 चे पोलीस निरीक्षक हणमंत ननावरे आणि नितिन सावंत यांनी महत्वाची कामगिरी केली असून त्यांना या मोठ्या कारवाईत बृहन्मुंबई महानगरपालिका, “एम-वाड पूर्व' येथील सहाय्यक वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रिया कोळी यांच्यासह 5 डाॅक्टरांचे वैद्यकीय पथकाने मदत केली. मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे हजारो, लाखो मुंबईकरांचे प्राण वाचले असुन या कामगिरीचे सह पोलीस आयुक्‍त (गुन्हे) मिलींद भारंबे, मा.उपर पोलीस आयुक्त विरेश प्रभु, मा.पोलीस उप आयुकत, (प्र-१) दत्ता नलावडे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्‍त (डी-पूर्व) नितीन अलकनुरे यांनी कौतुक केले आहे.

First published:

Tags: Crime, Mumbai