मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

ती ऑडिओ क्लिप Fake, वसुलीचं रॅकेट उद्धवस्त केल्यानं माझ्याविरुद्ध षडयंत्र; प्रियंका नारनवरे यांचा दावा

ती ऑडिओ क्लिप Fake, वसुलीचं रॅकेट उद्धवस्त केल्यानं माझ्याविरुद्ध षडयंत्र; प्रियंका नारनवरे यांचा दावा

प्रियंका नारनवरे (Priyanka Narnavare) यांची फुकट बिर्याणीची (Free biryani) ऑर्डर देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. उपायुक्तांनी आता एक नवा दावा केला आहे.

प्रियंका नारनवरे (Priyanka Narnavare) यांची फुकट बिर्याणीची (Free biryani) ऑर्डर देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. उपायुक्तांनी आता एक नवा दावा केला आहे.

प्रियंका नारनवरे (Priyanka Narnavare) यांची फुकट बिर्याणीची (Free biryani) ऑर्डर देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. उपायुक्तांनी आता एक नवा दावा केला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

पुणे, 01 ऑगस्ट: पुणे पोलीस (Pune Police) दलात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या आयपीएस प्रियंका नारनवरे (Priyanka Narnavare) यांची फुकट बिर्याणीची (Free biryani) ऑर्डर देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. आता प्रियंका नारनवरे यांनी स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एक ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून स्वत: ची बाजू मांडली आहे. एबीपी माझानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत. दरम्यान बिर्याणीबद्दल व्हायरल झालेली आणि गृहमंत्र्यांनी दिलेले चौकशीच्या आदेशाचे ती ऑडिओ क्लिप बनावट असल्याचा दावा प्रियंका यांनी केला आहे.

तसंच ज्या झोनमध्ये मी पोलीस उपायुक्त आहे. तिथे गेल्या 12 वर्षांपासून सुरु असलेलं वसुलीचं रॅकेट उद्धवस्त केल्यामुळे आपल्याविरुद्ध बनावट क्लिपचा आधार घेऊन कट रचण्यात आला आहे. या प्रकरणात पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. माझी बदली व्हावी यासाठी हे कट कारस्थान रचलं गेलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

वादग्रस्त वक्तव्यानंतर अखेर प्रसाद लाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त, Watch Video

काय आहे नेमकं प्रकरण

पुणे पोलिसांच्या मध्यवर्ती शहराच्या भागातल्या प्रमुख आयपीएस अधिकारी असलेल्या प्रियंका नारनवरे यांनी चक्क कर्मचाऱ्याला एस.पी. बिर्याणी मधून फुकट बिर्याणी आणण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि पुणे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एसपी बिर्याणी च्या साजुक तुपातल्या बिर्याणीसह नल्ली निहरी प्रॉन्स फ्राय अशा वेगवेगळ्या मेंदूची चर्चा करणारी ही ऑडिओ क्लिप पुणे पोलिसांसाठी आज मोठी डोकेदुखी ठरली आहे.

जॉन वरच्या पोलीस उपायुक्त असलेल्या आयपीएस प्रियंका नारनवरे यांना तब्बल 88 हजार रुपये पगार आहे. मात्र आपल्या पोलीस कर्मचाऱ्याला हद्दीतील सर्वात लोकप्रिय असलेल्या हॉटेलमधून मटन बिर्याणी पैसे न देता घेऊन येण्यासाठी आदेश दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.

HSC RESULT: उद्या लागेल बारावीचा निकाल? आज तारीख होणार जाहीर

ही ऑडिओ क्लिप इतकी व्हायरल झाली मंत्र्यांनाही त्याची दखल घ्यावी लागली. पुणे पोलीस दलाचे प्रमुख असलेले पोलीस आयुक्त दोन दिवस या क्लिपवर काय कारवाई करणार हे सांगत नव्हते मात्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी थेट या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले.

फुकट बिर्याणीच्या आरोप ज्या आधिकार्‍यांवर झालेत त्या आयपीएस प्रियंका नारनवरे यांच्याशी आम्ही बोललो, तेव्हा त्यांनी हे आपल्या विरोधातील षड्यंत्र आहे असा दावा केला आहे. हे षड्यंत्र दुसरे तिसरे कुणी नाही तर पुणे पोलीस दलातील एक डीसीपी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी केला असा दावाही त्यांनी केला आहे.

First published:

Tags: Pune