Home /News /maharashtra /

Maharashtra HSC Result 2021: महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल उद्या लागण्याची शक्यता, आज निकालाची तारीख होणार जाहीर

Maharashtra HSC Result 2021: महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल उद्या लागण्याची शक्यता, आज निकालाची तारीख होणार जाहीर

Maharashtra HSC Result 2021:महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ऑगस्ट (August) महिन्याच्या पहिला आठवड्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

    मुंबई, 01 ऑगस्ट: महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ऑगस्ट (August) महिन्याच्या पहिला आठवड्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीच्या निकालाची (HSC result) तारीख आज रविवारी, 1 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल उद्या (सोमवार 02ऑगस्ट) ला लागण्याची शक्यता आहे. दुपारी ऑनलाईन हा निकाल (online result) जाहीर होण्याची शक्यता मंडळातील सूत्रांकडून देण्यात आली. निकालास विलंब बारावीचा निकाल जुलै महिन्यातच जाहीर होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण मंडळानं सांगितलं होतं. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले असल्यानं निकाल ऑगस्ट महिन्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र आता मंडळाची निकाल जाहीर करण्यासाठी तयारी पूर्ण झाली असल्याने हा निकाल सोमवारपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. तशी घोषणाही करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर अखेर प्रसाद लाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त, Watch Video बोर्डाकडून रोल नंबर जारी बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. (Maharashtra HSC Results 2021) कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे. Maharashtra HSC Results 2021: कसा चेक कराल रोल नंबर अधिकृत वेबसाइट mh-hsc.ac.in वर जा. वेबसाइटवर गेल्यावर मुख्यपृष्ठावर, जिल्हा आणि तालुका निवडा आणि आपले नाव त्यात टाका. रोल नंबरच्या तपशीलांसह एक यादी स्क्रिनवर दिसेल. आपलं नाव आणि सीट नंबर तपासा आणि त्यानंतर तो नोट करुन ठेवा.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Exam result, HSC

    पुढील बातम्या