पुणे, 09 नोव्हेंबर: पुण्यात (Pune Fire) आग लागल्याची घटना घडली आहे. पुण्यातल्या पिसोळी भागात ही आग लागली आहे. फर्निचर (Furniture) च्या गोडाऊनला ही आग लागली. या आगीत गोडाऊन (Godown)जळून खाक झालं आहे. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास दगडे वस्तीतल्या एक लाकडी सामानाच्या (फर्निचर) गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीचे व्हिडिओ आता समोर आले आहेत.
पुण्यात अग्नितांडव pic.twitter.com/yAdbNG1tUA
— News18Lokmat (@News18lokmat) November 9, 2021
आगीची माहिती मिळताच पुणे आणि PMRDA 14 अग्निशमन दलांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. हेही वाचा- दहशतवाद्यांचं टाग्रेट ठरताहेत सामान्य नागरिक, काश्मीरमध्ये आणखी एकाची गोळ्या झाडून हत्या सुदैवानं या आगीत कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. जवळपास 24 हजार स्वेक्वअर फूट असलेलं गोडाऊन या आगीत खाक झालं आहे. गोडाऊनमधील फर्निचर आणि त्यासाठी लागणारं साहित्य जळून खाक झालं. दरम्यान ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.