श्रीनगर, 09 नोव्हेंबर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये (Srinagar) दहशतवादी सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहे. श्रीनगरमधील बोहरी कदल भागात सोमवारी दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली. काश्मीरमध्ये (kashmir) 24 तासांत झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला होता. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदीपोरा येथील मोहम्मद इब्राहिम खान (45) यांची सोमवारी दहशतवाद्यांनी (Terrorist)गोळ्या झाडून हत्या केली.
मोहम्मद हे सेल्समन म्हणून काम करायचे. रुग्णालयात उपचारादरम्यान इब्राहिम यांचा मृत्यू झाला. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, श्रीनगरमधील बांदीपोरा येथील निवासी गुलाम मोहम्मद खान यांचा मुलगा मोहम्मद इब्राहिम खान यांना जवळून गोळी मारण्यात आली. ज्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. खान यांच्या मृत्यूनंतर खोऱ्यातील एकूण नागरिकांचा आकडा 15 वर पोहोचला आहे.
हेही वाचा- Petrol Price Today: या शहरात 1 लीटर पेट्रोलचे दर ₹82.96 तर डिझेल 77.13 रुपयांवर; वाचा आजचा भाव
त्यांनी सांगितलं की, इब्राहिम खान जवळच्या महाराजगंज परिसरात सेल्समन म्हणून काम करायचे. याआधी रविवारी काश्मीरमधील बटमालू भागातील एसडी कॉलनीत 29 वर्षीय तौसीफ या पोलीस कॉन्स्टेबलची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पोलीस कॉन्स्टेबलच्या डोक्यात गोळी लागली. कॉन्स्टेबल तौसीफ अहमद असं त्याचं नाव आहे. रविवारी रात्री उशिरा श्रीनगरच्या बटमालू भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ही घटना घडवून दहशतवादी पळून गेले होते.
हेही वाचा- 50 MP चा Camera, Redmi पेक्षा कमी किंमत, जबरदस्त फिचर्स असलेला Smartphone लॉन्च!
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी नागरिकांच्या हत्येचा निषेध केला आहे. ओमर यांनी ट्विट केलं की, 'इब्राहिमची क्रूर हत्या निंदनीय आहे आणि मी त्याचा तीव्र निषेध करतो. दुर्दैवाने, इब्राहिमची हत्या ही खोऱ्यातील, विशेषतः श्रीनगरमधील लक्ष्यित हत्यांच्या मालिकेतील नवीनतम घटना आहे. अल्लाह त्यांना स्वर्गात स्थान देवो.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jammu and kashmir, Srinagar