Home /News /pune /

एक टक्का कोरोना बाधितांमुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण; अन्यथा जवळपास हटले असते निर्बंध

एक टक्का कोरोना बाधितांमुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण; अन्यथा जवळपास हटले असते निर्बंध

Lockdown in Pune: मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी (Corona cases decrease) होतं असली तरी, शहरातील कोरोना निर्बंध (Corona Restrictions) अद्याप हटवण्यात आले नाहीत.

    पुणे, 06 जून: मागील काही दिवसांपासून पुण्यात (Pune) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी (Corona cases decrease) होतं असली तरी, शहरातील कोरोना निर्बंध (Corona Restrictions) अद्याप हटवण्यात आले नाहीत. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण 6.11 टक्के इतकं आहे. त्यामुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण झाली आहे. 1.1 टक्के कोरोना बाधित रुग्ण अधिक असल्याने पुण्यातील कोरोना निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले आहेत. शासनाच्या नियमावलीनुसार पुण्यात 5 टक्के किंवा त्यापेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण असते, तर कोरोना निर्बंध जवळपास हटवण्यात आले असते. खरंतर, महाराष्ट्रातील कोरोना आलेख सध्या घसरत असताना दिसत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कोरोना निर्बंध हटवले जात आहेत. शहरातील कोरोनाबाधित रुग्ण आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावरून शहरातील निर्बंध हटवायचे  की नाही? याचा निर्णय घेतला जात आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येनुसार शहरांची विविध स्तरात विभागणी केली जात आहे. अशातच पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण शासनाच्या नियमावली पेक्षा 1.1 टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण झाली आहे. परिणामी कोरोना नियमांत सुट मिळाली नाही. पुण्यात जर कोरोनाबाधित रुग्णांच प्रमाण 5 टक्केपेक्षा कमी असतं, तर दुकाने दिवसभर खुली ठेवण्यास परवानगी मिळाली असती. तसेच नाट्यगृहे, मॉल 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा मिळाली असती. त्याचबरोबर खासगी आणि शासकीय कार्यालये, सार्वजिनक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू ठेवता आली असती. हे ही वाचा-पुणेकरांसाठी खूशखबर! निर्बंध आणखी झाले शिथिल; पाहा कुठल्या स्तरात समावेश? पुढील आठवड्यात निर्बंध हटण्याची शक्यता मागील काही दिवसांपासून पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा नियंत्रणात आला असून त्यामध्ये सातत्याने घट होताना दिसत आहे. हा कल कायम राहिल्यास पुढील आठवड्यापर्यंत पुण्यातील कोरोना निर्बंध जवळपास हटण्याची शक्यता आहे. कारण पुढील आठवड्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 5 टक्क्यांपर्यंत येईल. त्यामुळे शासनाच्या नियमावलीनुसार जवळपास सर्व निर्बंध हटू शकतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates, Lockdown, Pune

    पुढील बातम्या