मराठी बातम्या /बातम्या /पुणे /RTE मधून शाळेत प्रवेश हवाय? 50 हजार द्या; पुण्यात शिक्षणाधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

RTE मधून शाळेत प्रवेश हवाय? 50 हजार द्या; पुण्यात शिक्षणाधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

दुर्बल घटकांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून केलेल्या शिक्षणाचा अधिकार (RTE) कायद्याअंतर्गत या मुलीला पुण्यातल्या प्रथितयश शाळेत प्रवेश मिळाला होता. यादीत नावही होतं. पण प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्याने चक्क 50 हजारांची मागणी केली. कसं पकडलं त्याला जाळ्यात वाचा...

पुढे वाचा ...

    पुणे, 17 जुलै : समाजाच्या सर्व स्तरांतील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं या हेतूनं सर्व खासगी शाळांमध्ये दुर्बल घटकांतील मुलांना शिक्षण अधिकाराखाली(Right to Education) प्रवेश दिला जातो. या कायद्याअंतर्गत सर्व शाळांमधील 25 टक्के जागा राखून ठेवण्यात येतात आणि तिथं समाजातील वंचित, दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश दिला जातो. याच कायद्याअंतर्गत एका दुर्बल गटातील मुलीला प्रथितयश शाळेत प्रवेश मिळाला होता; मात्र प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या(Pune Municipal Corporation) अधिकाऱ्यानं मुलीच्या आईकडे तब्बल 50 हजार रुपयांची लाच (Bribe by education officer) मागितली. या महिलेनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Corruption Bureau) तक्रार दिल्यानं या लाचखोर अधिकाऱ्याला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ (Red Handed) पकडलं आहे.

    राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागानं (ACB-Pune Unit) या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं आहे. (Pune News) टाईम्स नाऊन्यूज डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.शिवाजी बबन बोखरे असं या अधिकाऱ्याचं नाव असून, तो पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात(Education Department) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी(Assistant Administrative Officer) म्हणून कार्यरत आहे.

    भरदिवसा दरोडा; मणप्पुरम गोल्ड लोन कंपनीच्या ऑफिसमध्ये तब्बल सव्वा 8 कोटींची चोरी

    50 वर्षीय बोखरे यानी या मुलीच्या आईकडे शालेय प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.

    शिक्षण अधिकाराखाली (RTE) या मुलीला एका प्रथितयश शाळेत प्रवेश मिळाला होता. शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात आलेल्या मुलांच्या यादीत या मुलीचं नाव होतं. त्याकरता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडं त्या मुलीच्या आईनं संपर्क साधला होता. त्यावेळी बोखरे यानं 50 हजार रुपये दिल्यास कागदपत्रे देण्याची अट घातली होती.

    माहेरघरीचं झाला विद्येचा अपमान; जागेच्या वादात शाळा आली रस्त्यावर

    त्यावर या मुलीच्या आईनं लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदवली. त्याची दखल घेत, या लाचखोर अधिकाऱ्याला पुराव्यासकट पकडण्याकरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचला आणि 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बोखरे याला रंगेहाथ पकडण्यात आलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बोखरे याला लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केली असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस उपायुक्त (Deputy Superintendent of Police ACB) श्रीहरी पाटील यांनी सांगितलं.

    शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गरीब, दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याच्या अशा घटना घडणं हे दुर्दैवाचं आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पालकांनी सजग राहून आवश्यकता भासल्यास तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. तरच या कायद्याचा उद्देश साध्य होईल. 2009 पासून हा कायदा अस्तित्त्वात आला आहे. यामुळे मोठ्या खासगी शाळांमध्ये गरीब गटातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणं शक्य झालं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Education department, Pune