आग्रा, 17 जुलै : कोरोना काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये देशातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी चोरी, दरोडा, हत्या या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. असाच प्रकार आग्रा येथे घडला आहे. आग्रा येथील मणप्पुरम गोल्ड लोन कंपनीच्या ऑफिसमध्ये शनिवारी दुपारी सहा चोरांनी दरोडा घातला. चोरांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बंधक बनवून तब्बल 17 किलो सोनं घेऊन फरार झाले. सोन्याबरोबरच त्यांनी ज्वेलरी आणि पाच लाख रुपयांची कॅशही चोरली आहे. चोरांनी पळ काढल्यानंतर कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
सूचना मिळताच पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरोडेखोरांची माहिती जमा करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. या अत्यंत पॉश भागात भर दिवसा दरोडासारख्या घटना घडत असल्यामुळे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
सेंट्रल बँक मार्गावर आहे कार्यालय
मिळालेल्या माहितीनुसार, कमला नगर भागातील सेंट्रल बँक मार्गावर एका इमारतीत मणप्पुरम गोल्ड लोन कंपनीचं ऑफिस आहे. या इमारतीत आणखी अनेक दुकानं आहेत. मणप्पुरम गोल्डचा ऑफिस पहिल्या मजल्यावर आहे. सांगितलं जात आहे की, दुपारी साधारण दोन वाजता दरोडेखोर ऑफिसमध्ये शिरले. ऑफिसमध्ये शिरताच त्यांनी मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं.
हे ही वाचा-आर्मी भरतीचं स्वप्न अधुर; मुख्यमंत्र्यांसाठी चिठ्ठी सोडून तरुणाची आत्महत्या
सर्व गुन्हेदारांनी आपले चेहरा झाकले होते. याशिवाय हातात शस्त्र होती. त्यांनी मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि तब्बल 17 किलो सोनं, ज्वेलरी आणि पाच लाख रुपये कॅश आपल्या बॅगेत भरले. यानंतर ते अत्यंत सहजपणे फरारही झाले. लुटलेल्या 17 किलो सोनं आणि दागिन्यांची किंमत तब्बल सव्वा 8 कोटी रुपयांहून अधिक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold price, Gold robbery