Home /News /pune /

Coronavirus : या 5 जिल्ह्यांत आहेत राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण; पुणे पहिल्या क्रमांकावर

Coronavirus : या 5 जिल्ह्यांत आहेत राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण; पुणे पहिल्या क्रमांकावर

मुंबईत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत (Mumbai Corona Update) दररोज 350 ते 400 रुग्णांची भर पडत आहे. तर, संपूर्ण राज्यभरातून दररोज 3500 ते 4000 नवे रुग्ण समोर येत आहेत

पुणे 28 ऑगस्ट : राज्यात कोरोनाची दुसरी लाट (2nd Wave of Coronavirus) आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. मात्र, पुणेकरांची चिंता अजूनही कायम आहे. कारण, सक्रिय रुग्णांचा बाबतीत पुणे राज्यात पहिल्या (Corona Cases in Pune) क्रमांकावर आहे. तर, मुंबईतील स्थिती मात्र काही प्रमाणात दिलासादायक आहेत. पुण्यात सध्या कोरोनाचे 13715 सक्रिय रुग्ण (Active Corona Cases) आहेत. तर, मुंबईत 2880 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत पुणे, ठाणे, अहमदनगर, सातारा आणि सांगली हे जिल्हे टॉप ५ मध्ये आहेत. मुंबईत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत (Mumbai Corona Update) दररोज 350 ते 400 रुग्णांची भर पडत आहे. तर, संपूर्ण राज्यभरातून दररोज 3500 ते 4000 नवे रुग्ण समोर येत आहेत. राज्यात लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण 10 टक्के आहे. सध्या राज्यात कोरोनाचे एकूण 51 हजार 500 सक्रिय रुग्ण आहेत. आनंदाची बातमी! कोरोना लसीकरणाबाबत भारतानं रचला नवा विक्रम या जिल्ह्यांत आहे सर्वाधिक सक्रिय रुग्ण - पुणे जिल्हा-13715 ठाणे जिल्हा- 7082 अहमदनगर--5295 सातारा-5254 सांगली--4876 कोरोना रुग्णांना एका वर्षानंतरही जाणवतायत साईड इफेक्ट्स, ही आहेत लक्षणं पुण्यातील कोरोना स्थिती - शुक्रवारी दिवसभरात पुण्यात 257 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, दिवसभरात 163 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात शुक्रवारी 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, यातील 10 रुग्ण पुण्याबाहेरील होते. सध्या 206 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील आतापर्यंतची एकूण कोरोनाबाधितांची संख्या 494724 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 8907 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 483506 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Corona updates, Coronavirus cases

पुढील बातम्या