जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / आनंदाची बातमी! शुक्रवारी Corona Vaccination बाबत भारतानं रचला नवा विक्रम; पंतप्रधानांनी केलं Tweet

आनंदाची बातमी! शुक्रवारी Corona Vaccination बाबत भारतानं रचला नवा विक्रम; पंतप्रधानांनी केलं Tweet

कसं शोधाल व्हॅक्सीनेशन सेंटर ?

कसं शोधाल व्हॅक्सीनेशन सेंटर ?

शुक्रवारी सर्वाधिक कोरोना लसीकरण उत्तर प्रदेशात (Vaccination in Uttar Pradesh) झालं. शुक्रवारी तिथे तब्बल 28 लाख 62 हजार जणांनी लस घेतली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 28 ऑगस्ट : कोरोनाची दुसरी लाट (2nd Wave of Coronavirus) काही प्रमाणात आटोक्यात येत असतानाच आता कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) बाबतीत देशानं शुक्रवारी नवा विक्रम रचला आहे. शुक्रवारी देशभरात 1 कोटी 64 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान म्हणाले, की आज देशाचं एक कोटी दैनंदिन लसीकरणाचं टार्गेट पूर्ण झालं. या यशासाठी लस घेणाऱ्या आणि या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांचं अभिनंदन कोरोना रुग्णांना एका वर्षानंतरही जाणवतायत साईड इफेक्ट्स, ही आहेत लक्षणं मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सर्वाधिक कोरोना लसीकरण उत्तर प्रदेशात (Vaccination in Uttar Pradesh) झालं. शुक्रवारी तिथे तब्बल 28 लाख 62 हजार जणांनी लस घेतली. दुसऱ्या नंबरवर कर्नाटक आहे. इथे 10 लाख 79 हजार जणांनी शुक्रवारी लस घेतली. केंद्रानं ऑगस्टमध्ये दररोज 1 कोटी लोकांचं कोरोना लसीकरण करण्याचं टार्गेट ठेवलं होतं. हे शुक्रवारी पूर्ण झालं आहे. भारतात लसीच्या तुटवड्यादरम्यान हे टार्गेट पूर्ण करणं म्हणजे मोठं यश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात 14 कोटीहून अधिक लोक असे आहेत ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. वाह! कमाल, मुंबईत 30 हजार बेड अन् रुग्ण फक्त 500 खाटांवर देशात सध्या कोव्हॅक्सिन (Covaxin), कोविशिल्ड (Covishield vaccine) आणि स्पूतनिकची (Sputnik V) लस दिली जात आहे. आतापर्यंत देशात सर्वाधित डोस कोविशिल्ड या लसीचे दिले गेले आहेत. देशात 54 कोटी डोस कोविशिल्डचे देण्यात आले आहेत. पुढच्या महिन्यापासून जायडस कॅडिलाची लसही 12 वर्षावरील सर्व लोकांना देण्यास सुरुवात केली जाईल. सरकारचा असा प्रयत्न आहे, की या वर्षीच्या शेवटीपर्यंत सर्वांना कोरोना लसीचे दोन डोस मिळावे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात