मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /COVID-19: राज्यात आजही विक्रमी 7975रुग्णांची भर, मात्र मृत्यू दर घसरल्याने दिलासा

COVID-19: राज्यात आजही विक्रमी 7975रुग्णांची भर, मात्र मृत्यू दर घसरल्याने दिलासा

याशिवाय चढ्या दराने फेस शिल्ड आणि मास्कची खरेदी मुंबईत करण्यात आली असून विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाचं हे कंत्राटं दिल्याचाही भाजपने दावा केला आहे. यावेळी ई टेंडरला बगल दिली गेल्याचे भाजपने आपल्या अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे.

याशिवाय चढ्या दराने फेस शिल्ड आणि मास्कची खरेदी मुंबईत करण्यात आली असून विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाचं हे कंत्राटं दिल्याचाही भाजपने दावा केला आहे. यावेळी ई टेंडरला बगल दिली गेल्याचे भाजपने आपल्या अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे.

मुंबईत 1374 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. जुलैच्या शेवटी आलेख घसरणीला लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई 15 जुलै: राज्यात आजही विक्रमी संख्येत नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात  7975  एवढ्या रुग्णांची भर पडली. तर 233 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,75,640    वर गेली असून मृत्यूचा आकडा 10928वर गेला आहे. आज एवढ्या जणांना सुटी देण्यात आली आहे. राज्यातल्या ACTIVE रुग्णांची संख्या 1,11,801 एवढी झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असतांनाच राज्याचा मृत्यू दर घसरला असून तो 3.96 टक्क्यांवर आला आहे.

मुंबईत 1374 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 96474 झाली आहे. तर आज 62 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या रूग्णाचा आकडा 5467 झाला आहे.

आज ठाणे महापालिका क्षेत्रात 400 कोरोणा पॉझिटिव्ह  रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 14419 झाली आहे

व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञाचा COVIDने झाला मृत्यू

पुणे विभागातील 31 हजार 390 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 51 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 18 हजार 196 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 654 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.31 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण   3.15  टक्के आहे,अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

First published: