मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी! काशीद बीच समोरील पूल कोसळला; एक कार आणि बाईक गेली वाहून, एकाचा मृत्यू

मोठी बातमी! काशीद बीच समोरील पूल कोसळला; एक कार आणि बाईक गेली वाहून, एकाचा मृत्यू

रायगड - मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील नदीवरील जुना पूल जोरदार पावसात वाहून गेला आहे.

रायगड - मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील नदीवरील जुना पूल जोरदार पावसात वाहून गेला आहे.

रायगड - मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील नदीवरील जुना पूल जोरदार पावसात वाहून गेला आहे.

अलिबाग, 11 जुलै : सकाळपासून संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस (Heavy rain) पडत आहे. जोरदार पाऊस सुरू असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगड - मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील नदीवरील जुना पूल जोरदार पावसात वाहून (Bridge washed away in Raigad) गेला. एक चार चाकी वाहन व एक मोटारसायकल सह पूल कोसळला असून मोटारसायकल पाण्यात वाहून गेला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पूल कोसळल्यामुळे अलिबाग-मुरुड हा रस्ता बंद झाला आहे. एक चार चाकी वाहन व एक मोटारसायकल सह पूल कोसळला असून मोटारसायकलस्वार पाण्यात वाहून असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एक चार चाकी वाहन व एक मोटारसायकल सह पूल कोसळला असून मोटारसायकलस्वार पाण्यात वाहून गेला. त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह  मिळाला आहे. मृत व्यक्तीचे नाव चव्हाण आहे अशी माहिती मुरूडचे नायब तहसिलदार रवींद्र सानप यांनी दिली आहे. मुरुड साळव रस्त्यावरील काशिद येथील उघडी वरील पूल पडला असून मुरुडला जाणारी वाहतूक बंद झाली आहे. एक वाहन पडले असून ते काढण्यात येत आहे. मुरुडला जाणारी वाहने साळव मार्गे सूपेगाव वरून वळवण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, रायगड यांनी दिली आहे.
First published:

Tags: Raigad

पुढील बातम्या