मराठी बातम्या /बातम्या /पुणे /''आई तू काळजी करू नकोस मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन,आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे''; सासरच्या जाचाला कंटाळलेल्या जावयाची पुण्यात आत्महत्या

''आई तू काळजी करू नकोस मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन,आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे''; सासरच्या जाचाला कंटाळलेल्या जावयाची पुण्यात आत्महत्या

Pune crime news: सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं आयुष्य संपवल्याची घटना तुम्ही पहिल्यांदा ऐकाल. पण ही घटना घडली आहे.

Pune crime news: सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं आयुष्य संपवल्याची घटना तुम्ही पहिल्यांदा ऐकाल. पण ही घटना घडली आहे.

Pune crime news: सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं आयुष्य संपवल्याची घटना तुम्ही पहिल्यांदा ऐकाल. पण ही घटना घडली आहे.

पुणे, 24ऑगस्ट: आजपर्यंत तुम्ही सासरच्या जाचाला कंटाळून महिलांनी आत्महत्या (Suicide)केल्याच्या घटना ऐकल्या असतील. मात्र सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं आयुष्य संपवल्याची घटना तुम्ही पहिल्यांदा ऐकाल. हो खरंय. पुण्यात (Pune) ही घटना घडली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं आत्महत्या केली आहे.

पत्नीच्या ओढणीनं या तरुणानं राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. आत्महत्यापूर्वी त्यानं सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यानं पत्नीच्या माहेरच्यांच्या जाचाला कंटाळून तसंच कर्जबाजारी झाल्यानं आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यानं पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला आहे. यात त्यांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.

''नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील!''

निखिल धोत्रे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. 29 वर्षीय निखिल हा - गोखलेनगर येथे सुगम चाळीमध्ये राहत होता. रविवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास त्यानं राहत्या घरी पत्नीच्याओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. वर्षभरापूर्वीच निखिलचं लग्न झालं होतं. पोलिसांना त्याची सुसाईड नोट सापडली आहे.

निखिलनं काय लिहिलं सुसाईड नोटमध्ये

आई तू काळजी करू नकोस मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे.

तसंच सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असून कर्जबाजारी झाल्याचाही उल्लेख त्यानं त्यात केला आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Pune, Suicide news