पुणे, 8 एप्रिल : कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) राज्यात वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचं, मास्क घालण्याचं तसेच आवाहन करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासही बंदी आहे. मात्र, असे असताना काहीजण या नियमांकडे दुर्लक्ष करतात. आता पुण्यातून (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावर थुंकल्याचा (spit) जाब विचारला म्हणून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुण्यातील हनुमान मोरे हे 7 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास माणिकबाग, पुणे येथील आपल्या कंपनीच्या ऑफिसच्या बाहेर पाणी पिण्यासाठी आले असता एक व्यक्ती तेथे थुंकला. यावेली हनुमान मोरे यांनी त्या व्यक्तीला जाब विचारत म्हटलं, "इथे थुंकण्याची जागा नाही तु इथे का थुंकलास, सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे त्यामुळे संसर्ग होऊ शकतो." यानंतर आरोपी व्यक्तीने हनुमान मोरे यांना धमकावण्यास सुरुवात केली.
हे पण पाहा : 80 कोटींचा पाऊस पाडण्याचा दावा; मांत्रिकाने तरुणीला निर्वस्त्र केलं आणि...
हनुमान मोरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं की, आरोपीने त्यांना धमकी देत म्हटलं "तु मला ओळखत नाहीस काय? तु कोणाशी बोलतोय. तुला कळत नाही का, मी करण दळवी सिंहगड रोडचा भाई आहे. तुला संपवून टाकेल." असे बोलून आरोपीने हनुमान मोरे यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेजारी पडलेला मोठा दगड उचलून तुला आता खल्लास करतो असे म्हणत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हनुमान मोरे यांच्या डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्न केला.
यावेळी हनुमान मोरे यांनी तो दगड चुकवून बाजूला झाले आणि तो दगड त्यांच्या ऑफिसच्या काचेवर लागून काच फुटली. यानंतर आरोपीने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हनुमान मोरे यांचे सहकारी भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर त्यांच्या ऑफिसमध्ये घुसुन कम्प्युटर, फर्निचर, ऑफिसच्या काचा दगडाने फोडल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.