80 कोटींचा पाऊस पाडण्याचा दावा; मांत्रिकाने तरुणीला निर्वस्त्र केलं आणि...

80 कोटींचा पाऊस पाडण्याचा दावा; मांत्रिकाने तरुणीला निर्वस्त्र केलं आणि...

मांत्रिकाकडून युवतीला निर्वस्त्र करत तिच्यासोबच घृणास्पद प्रकार करण्यात आला.

  • Share this:

नरेंद्र माटे वर्धा (प्रतिनिधी), 8 एप्रिल : वर्धा जिल्ह्यात पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा करण्यासोबतच गुप्तधनासाठी युवतीचा शारीरिक, मानसिक छळ केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणीच्या आईनंही या अंधश्रद्धेला खतपाणी घातलं आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांच्या तपासात वर्ध्याचे सखी वन स्टॉप सेंटर महत्वाचा दुवा ठरलं हे मात्र विशेष.

अद्याप लोकांमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याबाबत अंधश्रद्धा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. वर्धा जिल्ह्यात पैशांचा पाऊस पडत असल्याच्या नावाखाली युवतीचा छळ केला गेला. अघोरी पूजा करून लाख, दोन लाख नव्हे तब्बल 80 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचा दावा मांत्रिकाने केला होता. त्यासाठी युवतीला निर्वस्त्र करत तिच्यासोबच घृणास्पद प्रकार करण्यात आला. सातत्याने होणाऱ्या या छळाला कंटाळून पीडिता घरून निघून गेली होती. यामध्ये पीडितेच्या आईची भूमिकाही संतापजनक आहे.

मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला हा संतापजनक प्रकार सखी वन स्टॉप सेंटरच्या सहकार्यातून उघडकीस आला. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पीडितेचा नातलग व बाळू मंगरूळकर या दोघांना अटक केली आहे.

हे ही वाचा-PUBG चा सीन रिक्रिएट करीत कुटुंबावरच झाडल्या गोळ्या; दोघांचा मृत्यू, 3 जणं जखमी

मिळालेल्या माहितीनुसार युवतीची आई एका दुकानात काम करीत होती. तिथं ओळख झालेल्या महिलेनं तिला मुलीची पूजा करत पैशाचा पाऊस पाडणारा मांत्रिक असल्याचं सांगितलं. तेथून या छळाला सुरुवात झाली. युवतीला वर्ध्यासोबतच लगतच्या जिल्ह्यांतही नेण्यात आलं होतं. युवतीच्या शरीरात मुंजा म्हणजेच अतृप्त आत्मा सोडून हा पैशाचा पाऊस पाडण्याच आमिष मांत्रिकाकडून दाखवण्यात आला. ही प्रक्रिया होत असताना मांत्रिकाचा डी आर म्हणून उल्लेख करण्यात येत होता. या घटनेत पीडितेच्या कुटुंबातील व्यक्तींसह बाहेरील लोकांचाही सहभागी असल्याचं पुढं आलं आहे. कुवारा पेपर, विधवा पेपर, डीआर असे कोड यात बोलले जात होते. या घटनेत पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उजेडात येण्याची शक्यता आहे. यामध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पंकज वंजारे यांची मदत झाली. मिसिंगची तक्रार दाखल असणाऱ्या युवतीचा शोध सुरू असताना युवतीने रामनगर पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. त्यानंतर तिला सखी वन स्टॉप सेंटर येथे निवाऱ्यासाठी पाठविण्यात आले. सखी वन स्टॉप सेंटरच्या वतीनं युवतीच समुपदेशन केंद्र प्रशासक रेश्मा रघटाटे यांनी केलं आणि त्यानंतर खरा प्रकार हा उघडकीस आला. याबाबत अधिक तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: April 8, 2021, 9:43 PM IST

ताज्या बातम्या