कोरोना संकटात Remdesivir चा काळाबाजार करणाऱ्यांना बेड्या, पुणे पोलिसांची कारवाई

कोरोना संकटात Remdesivir चा काळाबाजार करणाऱ्यांना बेड्या, पुणे पोलिसांची कारवाई

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना नागरिकांचा गैरफायदा घेत काळाबाजार करणाऱ्या टोळी सक्रिय झाल्याचं दिसत आहे.

  • Share this:

पुणे, 15 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Corona virus spike in Maharashtra) असतानाच रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा (Remdesivir injection shortage) जाणवत आहे. मात्र, या संकट काळातच काही जण रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत आहेत. अशाच प्रकारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी (Pune Police) गजाआड केलं आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन ब्लॅकमध्ये 10,000 रुपयांना विक्री करत असल्याची माहिती पुण्यातील गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलीस आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मिळून संयुक्तपणे कारवाईसाठी सापळा रचला. एक डमी ग्राहक वाघोली परिसरात पाठवला आणि आरोपीला दोन रेमडेसिवीर इंजेक्शनसह ताब्यात घेतले.

अशाच प्रकारे डिमेलो पेट्रोलपंज नगर रोड जवळ एक व्यक्ती 18,000 रुपयांत रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करत असल्याची माहिती पोलसाांना मिळाली होती. या ठिकाणी पुण्यातील गुन्हे शाखा युनिट 4 ने डमी ग्राहक पाठवून मोहम्मद मेहबुब पठाण आणि त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या दोन बॉटल्स जप्त केल्या आहेत. यावर (For use of Government of Maharashtra Not for sale) असे छापण्यात आलेले आहे.

वाचा: मोठी बातमी, पुण्यात lockdown ठरला फायदेशीर, कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण घटले!

ही इंजेक्शन शासकीय रुग्णालयांना पुरवठा केलेली असून आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारातून जास्त किमतीने विक्री करण्यासाठी दौंड येथून मिळवल्याची माहिती समोर आली आहे. या रॅकेटमधील 4 आरोपींना पोलिसांनी पकडले असून ही एक मोठी टोळी असण्याचा अंदाज पोलिसांना आहे.

यापूर्वीही रेमडेसिवीरचा साठा जप्त

यापूर्वीही एफडीए अधिकाऱ्यांनी 11 एप्रिल 2021 रोजी एका व्यक्तीला अटक केली होती. या आरोपीकडून एक रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आला होता. तर 12 एप्रिल 2021 रोजी युनिट 3 च्या गुन्हे शाखा अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला दोन रेमडेसिवीर इंजेक्शनसह अटक केली होती.

Published by: Sunil Desale
First published: April 15, 2021, 7:34 PM IST

ताज्या बातम्या