पुणे, 06 फेब्रुवारी : राज्यामध्ये पुण्यात कोरोनाचा (Pune coronavirus) सर्वात पहिला रुग्ण सापडला होता आणि त्यानंतर फक्त पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra coronavirus) हादरला होता. आज त्याच पुण्यातून दिलासादायक अशी बातमी येते आहे. पुण्यात आज दिवसभरात कोरोनाचा एकही बळी नाही आहे. तब्बल 11 महिन्यानंतर पुण्यातून अशी पॉझिटिव्ह न्यूज मिळाली आहे. 30 मार्च 2020 रोजी पुण्यात कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच होती. आतापर्यंत 4774 कोरोना बळी गेले आहे. गेली 11 महिने एकही दिवस असा गेला नाही की पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. पण आज अखेर पुणेकर कोरोनाला हरवण्यात यशस्वी झाले. आज दिवसभरात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. पुण्यात आज दिवसभरात 180 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 265 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत एकूण 1 लाख 86 हजार 801 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्यातील आता एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 92 हजार 982 झाली आहे. त्यापैकी 1407 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजे इतक्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. हे वाचा - कोरोना लसीकरणानंतर 1800 आरोग्य कर्मचारी बेपत्ता; वरिष्ठांकडून तपास सुरू दरम्यान पुणे विभागाचा विचार करता विभागात बाधित रुग्णांची संख्या 5 लाख 94 हजार 604 झाली आहे. 5 लाख 72 हजार 336 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 96.25 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. हे वाचा - कोरोनानं पिच्छा सोडला पण उलटतोय रुग्णांचा जुना आजार; बरे झालेल्यांची चिंता कायम राज्याचा शुक्रवारच्या आकडेवारीनुसरा राज्यात एकूण 1952187 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 33936 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट हा 95.76% झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.