कोरोना लसीकरणानंतर 1800 आरोग्य कर्मचारी बेपत्ता; वरिष्ठांकडून तपास सुरू

कोरोना लसीकरणानंतर 1800 आरोग्य कर्मचारी बेपत्ता; वरिष्ठांकडून तपास सुरू

कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होताच 1800 हून अधिक आरोग्य कर्मचारी बेपत्ता झाले आहेत.

  • Share this:

बरेली, 6 फेब्रुवारी : कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होताच 1800 हून अधिक आरोग्य कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. आरोग्य विभागाकडून 26292 कर्मचाऱ्यांचा डेटा सरकारला पाठविण्यात आला होता. मात्र आता 24259 आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा समोर आला आहे. आणि 1800 कर्मचाऱ्यांचा माहिती लागत नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या रेकॉर्डमध्ये काही गोंधळ झाला आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे. (1800 health workers missing after corona vaccination)

कोरोना महासाथीची लस सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली. सरकारने सर्व जिल्ह्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी मागवली होती. यामध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जिल्ह्यातून आलेली यादी शासनाला पाठविण्यात आली होती. त्यात 26292 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जेव्हा लसीकरण सुरू झालं तेव्हा 1800 हून अधिक कर्मचाऱ्यांची खबर लागली नाही. लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि आतापर्यंत 24289 आरोग्य कर्मचाऱ्यांचा रेकॉर्ड समोर आला आहे. लाइव्हहिंदुस्तानने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा-VIDEO :उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस महिला नेता ढसाढसा रडू लागली, कार्यकर्ते शॉक

एकच नाव दोन वेळा असल्याची शक्यता

जिल्हा प्रतिरक्षण अधिकारी डॉ. आरएन सिंह यांनी सांगितलं की, लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तब्बल 1800 आरोग्य कर्मचारी कमी असल्याचे समोर आले. आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे दोन वेळा किंवा अधिक वेळा पोर्टलवर अपलोड झाल्याची शक्यता आहे. (1800 health workers missing after corona vaccination) कदाचित आरोग्य विभागात नसलेल्या नागरिकांची नाव यामध्ये नोंदवली गेली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: February 6, 2021, 6:00 PM IST

ताज्या बातम्या