मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

लोणावळ्यात कलम 144 जमावबंदीच्या आदेशाला पर्यटकांकडून हरताळ, भुशी डॅमवर गर्दी, Watch Live Video

लोणावळ्यात कलम 144 जमावबंदीच्या आदेशाला पर्यटकांकडून हरताळ, भुशी डॅमवर गर्दी, Watch Live Video

Lonavla Bhushi Dam: कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) वाढत्या प्रार्दुभावामुळे लोणावळ्यातील (Lonavla) पर्यटनस्थळी 144 कलम (Section 144) लागू करण्यात आला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

पुणे, 17 जुलै: कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) वाढत्या प्रार्दुभावामुळे लोणावळ्यातील (Lonavla) पर्यटनस्थळी 144 कलम (Section 144) लागू करण्यात आला आहे. तसंच येत्या आठवड्यातही पुणे (Pune) आणि पिंपरी चिंडवड (Pimpri Chinchwad) मध्ये निर्बंध (Restrictions) कायम राहणार असल्याचं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र कलम 144 जमावबंदीचा आदेश धुडकावून भुशी डॅमवर (Dhushi Dam) पर्यटक दाखल झाले.

काल वाढत्या कोरोनोचा अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आदेश जारी केले होते. त्यामुळे पर्यटन बंदी तसेच जमावबंदीच्या आदेशाला पर्यटकांनी हरताळ फासल्याचं चित्र आहे.

दरम्यान पर्यटक भुशी डॅमवर दाखल झाल्याचं समजताच पोलीस पर्यटनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी पर्यटकांवर कारवाई केली आहे. डॅमवर दाखल झालेल्या पर्यटकांना पोलिसांनी घरचा रस्ता दाखवला आहे.

सध्या भूशी डॅम पर्यटक मुक्त झाले असून लोणावळा खंडाळा येथील इतर पर्यटन स्थळावर पोलीस बंदोबस्त वाढवला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लोणावळ्यात कलम 144 लागू

लोणावळ्यात पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आला असून पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी असेल. आजपासून नवीन नियम लागू करण्यात आलेत.

हेही वाचा- कमाल! अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी होणार 'ग्रॅज्युएट', पाहा BA ची मार्कशीट

या पर्यटनास्थळावर नियम लागू

भुशी डॅम

घुबड तलाव

लोणावळा डॅम

तुंगाली डॅम

राजमाची पॉइंट

मंकी पॉइंट

अमृतांजन ब्रिज

वलवण डॅम

एकविरा मंदिर परिसर

वेहेरगाव

टायगर पॉइंट

लायन पॉइंट

शिवलिंग पॉइंट

कार्ला लेणी

भाजे लेणी

लोहगड किल्ला

तुंग किल्ला

विसापुर किल्ला

तिकोणा किल्ला

पवना धरण परिसर

भाजे धबधबा

धबधबे आणि धरण या ठिकाणी एक किलोमीटरपर्यंतच्या परिसरात हे नियम लागू राहतील.

First published:

Tags: Coronavirus, Pune, Pune cases