नवी दिल्ली, 06 जून : देशात कोव्हिड - 19 (Covid-19 Infection) वाढत्या रुग्ण संख्येमुळे भारताने स्पेनला (Spain) मागे टाकत 5वा संक्रमित देश बनला आहे. जॉन हॉपकिंस यूनिवर्सिटीच्या (John Hopkins university) आकडेवारीनुसार, भारतात कोरोना संक्रमणाची (Coronavirus Infection) एकूण 2,43,733 इतकी प्रकरणं आहेत. याबरोबरच भारत काही आकड्यांनी स्पेनच्याही पुढे निघून गेला.
याच्याआधी शनिवारी आलेल्या आकड्यांवरून भारत इटलीला मागे टाकत साथीच्या रोगामुळे सर्व देशांमध्ये सर्वाधिक रुग्ण असलेल्या भारत जगातील सहावा देश बनला होता. पण आता भारतात पुन्हा कोरोनाच्या आकड्यांनी कहर केला आहे. त्यामुळे आता स्पेनलाही मागे टाकून 5 वा सर्वात संक्रमित देश बनला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 1,15,942 रुग्णांवर उपचार सुरू
शनिवारी देशात 24 तासामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 9,887 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण कोव्हिड-19 रुग्णांची संख्या 2,36,657 झाली होती. यामध्ये 24 तासांत 294 रुग्णांनी आपला जीव गमावला. ज्यामुळे मृतांची संख्या 6,642 वर पोहोचली आहे. देशात गेल्या तीन दिवसांत सतत रुग्णांचे सर्वाधिक आकडे समोर येत आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, देशात 1,15,942 संक्रमित रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 1,14,072 लोक बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 48.20 टक्के रग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, भारतात आतापर्यंत 45,24,317 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यामध्ये 1,37,938 रुग्णांची चाचणी ही गेल्या 24 तासांमध्ये करण्यात आली आहे.
देशात या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत 6,642 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 2,849 मृत्यू झाले. यानंतर गुजरातमध्ये 1,190 लोकांचा मृत्यू झाला, दिल्लीत 708, मध्य प्रदेशात 384, पश्चिम बंगालमध्ये 366, उत्तर प्रदेशात 257, तमिळनाडूमध्ये 232, राजस्थानमध्ये 218, तेलंगणामध्ये 113 आणि आंध्र प्रदेशात 73 लोकांचा मृत्यू झाला आहे.
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine