मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणेकरांना दिलासा; खासगी रुग्णालयाच्या 80 % खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश

पुणेकरांना दिलासा; खासगी रुग्णालयाच्या 80 % खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश

पुण्यात काल एकाच दिवशी तब्बल 4426 नवे रूग्ण आढळून आल्याने कोरोना साथीचा शब्दश: विस्फोट झाला आहे

पुण्यात काल एकाच दिवशी तब्बल 4426 नवे रूग्ण आढळून आल्याने कोरोना साथीचा शब्दश: विस्फोट झाला आहे

पुण्यात काल एकाच दिवशी तब्बल 4426 नवे रूग्ण आढळून आल्याने कोरोना साथीचा शब्दश: विस्फोट झाला आहे

पुणे, 29 मार्च : पुण्यात काल एकाच दिवशी तब्बल 4426 नवे रूग्ण आढळून आल्याने कोरोना साथीचा शब्दश: विस्फोट झाला आहे. त्यामुळे रूग्णांना बेड्स न मिळण्याच्या प्रचंड तक्रारी पालिका नियंत्रण कक्षाला येत आहेत. म्हणूनच तातडीच्या उपाययोजना म्हणून पालिकेनं शहरातील खासगी हॉस्पिटलचे 80 टक्के बेड्स फक्त कोविड रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केलेत. या निर्णयामुळे पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रूग्णांसाठी जास्तीचे 2 हजार बेड्स उपलब्ध होणार आहेत.

पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी न्यूज18 लोकमतला यासंबंधीची माहिती दिली. यापूर्वी शहरातील खासगी हॉस्पिटलमधून फक्त 50 टक्के बेड्स कोविडसाठी राखीव होते. त्यानुसार 5 हजार बेड्स कोविड रूग्णांसाठी उपलब्ध होते. पण गेल्या आठवड्यात कोविड रूग्णवाढीचा दैनंदिन आकडा तीन हजारांवरून थेट साडेचार हजारांवर पोहोचल्यानं कोविड रूग्णांना बेड्स अपुरे पडू लागले होते.

हे ही वाचा-पुण्यात कोरोनाचा विस्फोट होत असतानाच अदार पूनावाला यांनी दिली GOOD NEWS

त्यामुळे उपचारांअभावी रूग्णांची मृत्यूसंख्या वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली होती. किंबहुना कोविड मृत्यूंचा दैनंदिन आकडा देखील 22 वरून 42 वर पोहोचला होता. म्हणूनच पालिका आयुक्तांनी आज सुट्टीचा दिवस असूनही प्रशासनाची तातडीची बैठक बोलावली आणि त्यात कोविड बेड्सचा आढावा घेतला आणि वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन 80 टक्के बेड्स फक्त कोविडसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश खासगी रूग्णालयांना दिलेत. या निर्णयामुळे कोविड रूग्णांच्या नातेवाईकांची बेड्ससाठीची वणवण काही दिवसांसाठी तरी थांबणार आहे.

खासगी हॉस्पिटलसोबतच जम्बो कोविड हॉस्पिटलमध्येही 10 आयसीयू बेड्स वाढवले जाणार आहेत. तसेच मिलिटरी कमांड हॉस्पिटलमधील 30 आयसीयू बेड्स मिळवण्यासाठी पालिकेनं लष्कर विभागाला विनंती केल्याचं अति. आयुक्त रूबल आगरवाल यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना सांगितलं.

गेल्या सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवानंतर पुण्यात अशाच पद्धतीने कोरोनाची मोठी लाट आली होती. त्यात कित्येक जण उपचाराअभावी मृत्यूमुखी पडले होते. आतातर तेव्हाच्या दुप्पट रूग्णसंख्या वाढत आहे. म्हणूनच कोरोनाची ही साखळी तोडायची असेल तर टोटल लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असं प्रशासनाला वाटू लागलंय. दोन दिवसात त्याचाही निर्णय अपेक्षित आहे.

First published:

Tags: Covid cases, Pune