पुणे, 21 ऑक्टोबर: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची (Corona Virus) पहिला रुग्ण हा पुण्यात (Pune)आढळून आला होता. त्यानंतर पुण्यात (Pune Corona Virus) कोरोना व्हायरसनं थैमान घातलं होतं. पुण्यात कोरोनाची मृत्यूसंख्या अधिक होती. अशातच पुण्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी जवळपास आठ महिन्यांनी पुण्यात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही (Pune Records Zero Covid-19 Deaths). म्हणजेच बुधवारी पुण्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. पुणे शहराचे (Pune City Mayor) महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol)यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याचं संपूर्ण श्रेय पुणेकरांना दिलं आहे.
पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्युची नोंद नाही !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 20, 2021
पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय.
पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झालेली नाही. पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. काल (बुधवार) तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.6 फेब्रुवारी 2021 नंतरनंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय, असं ट्विट पुण्याच्या महापौरांनी केलं आणि आनंद व्यक्त केला आहे. डॉक्टर्स आणि टीमचे मानले आभार शहरातील 118 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ९३ हजार ४१४ झाली आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद, असं ट्विटही त्यांनी केलं आहे.
दिवसभरात ११८ रुग्णांना डिस्चार्ज !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 20, 2021
शहरातील ११८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ९३ हजार ४१४ झाली आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद !#PuneFightsCorona
बुधवारी पुण्यात दिवसभरात 5 हजार 986 टेस्ट घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 34 लाख 94 हजार 837 इतकी झाली आहे. तर पुण्यात उपचार घेणाऱ्या 998 रुग्णांपैकी 151 रुग्ण गंभीर तर 178 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. हेही वाचा- Porn बघायला नकार दिल्यानं 6 वर्षाच्या मुलीची हत्या, तीन अल्पवयीन मुलांना अटक पुणे कोरोना अपडेट : बुधवार दि. 20 ऑक्टोबर, 2021 उपचार सुरु : 988 नवे रुग्ण : 112 (5,03,469) डिस्चार्ज : 118 (4,93,414) चाचण्या : 5,986 (34,94,837) मृत्यू : 0 (9,067) आता थेट सोसायट्यांमध्येच लसीकरण पुणे महानगरपालिका हद्दीत लसीकरण वेगाने तर होत आहेच मात्र राहिलेल्या नागरिकांनाही लवकर लस देणे आवश्यक असून त्यासाठी थेट सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरणाची विशेष मोहिम पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेतली आहे. ज्या सोसायटीमधील नागरिकांचे लसीकरण राहिलेले आहे, अशा सोसायट्यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अपेक्षित लाभार्थी संख्या कळवावी. पुणे मनपा हद्दीत विक्रमी लसीकरण झालेले असून असे असले तरी या लसीकरणाला आणखी वेग देण्याचा प्रयत्न आहे. हेही वाचा- पाकिस्तानच्या कुरापती, ड्रोननं अमृतसरमध्ये केलेल्या कृत्यानंतर BSF चा गोळीबार आजवर लसीकरणाबाबतीत महापालिकेने राबवलेल्या सर्वच विशेष मोहीमा यशस्वी झालेल्या आहेत. या मोहिमेलाही पुणेकर प्रतिसाद देतील, हा विश्वास वाटतो, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.