मराठी बातम्या /बातम्या /देश /पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, अमृतसरजवळ ड्रोननं टाकलं हेरॉईन टाकताच BSF नं केला गोळीबार

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, अमृतसरजवळ ड्रोननं टाकलं हेरॉईन टाकताच BSF नं केला गोळीबार

सीमा सुरक्षा दलाने (BSF) भारत-पाक सीमेवरील (Indo-Pak Border) अमृतसर (Amritsar) सेक्टरमध्ये एका ड्रोनवर (Drone) गोळीबार केला आहे.

सीमा सुरक्षा दलाने (BSF) भारत-पाक सीमेवरील (Indo-Pak Border) अमृतसर (Amritsar) सेक्टरमध्ये एका ड्रोनवर (Drone) गोळीबार केला आहे.

सीमा सुरक्षा दलाने (BSF) भारत-पाक सीमेवरील (Indo-Pak Border) अमृतसर (Amritsar) सेक्टरमध्ये एका ड्रोनवर (Drone) गोळीबार केला आहे.

पंजाब, 21 ऑक्टोबर: सीमा सुरक्षा दलाने (BSF) भारत-पाक सीमेवरील (Indo-Pak Border) अमृतसर (Amritsar) सेक्टरमध्ये एका ड्रोनवर (Drone) गोळीबार केला आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. 19 आणि 20 ऑक्टोबरच्या मध्यरात्री, बीएसएफच्या(Border Security Force) जवानांनी पाकिस्तानकडून येणाऱ्या ड्रोनचा आवाज ऐकला आणि भारतीय हद्दीत प्रवेश केल्यावर त्यावर गोळीबार केला. त्याच दरम्यान ड्रोनमधून भारतीय हद्दीत एक सफेद पिशवी टाकली, ज्यात 6 कोटी रुपये किंमतीची 1.1 किलो हेरॉईन होती. लष्करानं ते हेरॉईन जप्त केलेत.

गेल्या दोन महिन्यांत पाकिस्तानने ड्रोनद्वारे ड्रग्सची तस्करी करण्याचा प्रयत्न करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 10 सप्टेंबरला सीमा सुरक्षा दलाने तरणतारणमधील हवेलीयन सीमा चौकीजवळून सहा पॅकेट हेरॉईन जप्त केली होती. ही घटना रात्री 11.15 च्या सुमारास घडली होती. जेव्हा सैनिकांनी ड्रोनचा आवाज ऐकला, तेव्हा एक अलर्ट जारी करण्यात आला, त्यानंतर शेतात काहीतरी पडल्याचा आवाज देखील आला. लष्करानं ड्रोनवर 14 राउंड फायर केले, जे पाकिस्तानात पुन्हा परत जाण्यात यशस्वी झाला.

सुरक्षा दलांनी पंजाबमधून पाकिस्तानमधून आलेल्या शस्त्रांचा मोठा साठा केला जप्त

पंजाबमध्ये सुरक्षा दलांनी पाकिस्तानचा मोठा कट उधळून लावला आहे. पंजाब पोलीस आणि सीमा सुरक्षा दलानं बुधवारी आंतरराष्ट्रीय सीमेजवळील तरणतारण जिल्ह्यातील खेमकरन भागात शोध मोहिमेदरम्यान शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला. बीएसएफ आणि पंजाब पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेंस विंगनं एका संयुक्त कारवाईमध्ये 22 पिस्तूल ( 30 बोअर स्टार मार्क), 44 मॅगझिन, 100 काडतुसे आणि एक किलो हेरॉईन जप्त केली आहे.

हेही वाचा- 'आज होगा जश्न', भारत देश कोरोना लसीकरणात बनवणार नवा रेकॉर्ड

कार्यवाहक पोलीस महासंचालक (DGP) इक्बाल प्रीत सिंह सहोटा म्हणाले की, पोलिसांना अशी गुप्त सूचना मिळाली होती की, पाकिस्तानच्या सीमेजवळ काही संशयास्पद व्यक्तींनी शस्त्रे आणि हेरॉईनचा मोठा माल लपवून ठेवला होता. त्यानंतर काउंटर इंटेलिजन्स अमृतसरला घटनास्थळी पाठवण्यात आले आणि बीएसएफ अधिकाऱ्यांसोबत शोध मोहिमेचे नियोजन करण्यात आले. शोध मोहिमेदरम्यान, टीमनं 44 पिशव्यांसह 44 मॅगझिन आणि 100 जिवंत गोळ्या जप्त केल्या आहेत. हे सर्व भातशेतात लपवण्यात आलं होतं. प्राथमिक तपासात शस्त्रे लपवण्याच्या मार्गातून हे स्पष्ट झाले आहे की, यामागे पाकिस्तानी तस्करांचा हात आहे.

हेही वाचा-  EPFO: PF Account चे हे 6 फायदे तुम्हाला माहित आहेत का? सहज मिळवता येईल लाभ

 पाकिस्तान सतत शस्त्रे आणि हेरॉईनचा माल पंजाबला पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात 2019 मध्ये 232.561 किलो हेरॉईन पंजाबमध्ये पकडले गेले. त्याच वेळी, 2020 मध्ये हा आकडा 506.241 किलो होता. तर यावर्षी 31 मे रोजीपर्यंत 241.231 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

First published:

Tags: Drone shooting, India, Pakistan