जाहिरात
मराठी बातम्या / देश / Porn बघण्यास दिला नकार, 6 वर्षांच्या मुलीची दगडानं ठेचून हत्या; तीन अल्पवयीन मुलांना अटक

Porn बघण्यास दिला नकार, 6 वर्षांच्या मुलीची दगडानं ठेचून हत्या; तीन अल्पवयीन मुलांना अटक

Porn बघण्यास दिला नकार, 6 वर्षांच्या मुलीची दगडानं ठेचून हत्या;  तीन अल्पवयीन मुलांना अटक

6 वर्षीय चिमुरडीची (6-year-old girl) हत्या करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

गुवाहाटी, 21 ऑक्टोबर: आसाममध्ये (Assam) एक धक्कादायक घटना घडली आहे. 6 वर्षीय चिमुरडीची (6-year-old girl) हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे ही हत्या (kill) 3 अल्पवयीन मुलांनी केली आहे. या हत्येमागचं कारण ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बुधवारी आसामच्या (Assam’s Nagaon district) नागाव जिल्ह्यातील पोलिसांनी 8 ते 11 वयोगटातील तीन अल्पवयीन मुलांना 6 वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. तसंच या हत्येशी संबंधित एका मोठ्या व्यक्तीला अटक केली आहे. या मुलीनं पॉर्नोग्राफिक व्हिडिओ (watch pornographic clips) पाहण्यास नकार दिल्यानं तिच्या हत्या करण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. हेही वाचा-  पाकिस्तानच्या कुरापती, ड्रोननं अमृतसरमध्ये केलेल्या कृत्यानंतर BSF चा गोळीबार मंगळवारी जिल्ह्यातील कालियाबोर भागातील एका खोदकाम केलेल्या शौचालयात मुलीचा मृतदेह सापडल्यानं एक खळबळ उडाली. असा आरोप करण्यात येत आहे की, आरोपी तीन अल्पवयीन मुलांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी याबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. “मिसा, कालियाबोर येथे राहणारी 6 वर्षांच्या मुलीच्या दुर्दैवी हत्येचा 24 तासांच्या आत उलगडा झाला. 3 अल्पवयीन, 1 प्रौढ व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नागाव पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी त्यांच्या अधिकृत हँडलवरून ट्विट केलं. 8 ते 11 वयोगटातील आरोपींना अश्लील व्हिडिओ पाहण्याचं व्यसनं असून कोणताही कट रचण्यास आणि भयंकर गुन्हा करण्यास सक्षम आहेत. असे वाटते की आत्मनिरीक्षण आणि सामाजिक हस्तक्षेपाची वेळ आली आहे, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. हेही वाचा-  ‘आज होगा जश्न’, भारत देश कोरोना लसीकरणात बनवणार नवा रेकॉर्ड रिपोर्टनुसार, तीन अल्पवयीन पीडितेच्या घराजवळ राहत होते आणि ते त्यांच्या मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहत असत. मंगळवारी त्यांनी कथितरित्या पीडितेला पॉर्न व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्यावर त्यांनी तिची दगडानं ठेचून हत्या केली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. दोन आरोपी 11 वर्षांचे आणि एक 8 वर्षांचा आहे. अल्पवयीन तिघांपैकी एकाचे वडील असलेल्या व्यक्तीच्या मोबाइलवर आरोपी पोर्नोग्राफी व्हिडिओ पाहत असत. आम्ही पॉर्न व्हिडिओनं भरलेला फोन जप्त केला आहे, नागावचे पोलीस अधीक्षक आनंद मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितलं. अटक करण्यात आलेला व्यक्ती तीन अल्पवयीन मुलांपैकी एकाचे वडील आहेत. कौटुंबिक/सामाजिक हस्तक्षेप आणि मुलांना संस्थात्मक मार्गदर्शन या 4 तरुणांचे प्राण वाचवू शकले असते. एकानं जीव गमावला, तीन आयुष्यासाठी हरले. हे आपल्या आजूबाजूच्या कोणासोबत किंवा कधीही होऊ शकते, असं ट्विट नागावचे पोलीस अधीक्षक आनंद मिश्रा यांनी केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात