मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'छत्रपती शिवाजी महाराज मनामनात,शिवराज्याभिषेक घराघरात'; रायगडावर सोहळ्याला सुरुवात

'छत्रपती शिवाजी महाराज मनामनात,शिवराज्याभिषेक घराघरात'; रायगडावर सोहळ्याला सुरुवात

तोच जोश, तोच उत्साह, तो क्षण पुन्हा अनुभवायचा आहे, पण आपल्या गडातून म्हणजे आपल्याच घरातून असं लिहत त्यांनी जनतेला घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.

तोच जोश, तोच उत्साह, तो क्षण पुन्हा अनुभवायचा आहे, पण आपल्या गडातून म्हणजे आपल्याच घरातून असं लिहत त्यांनी जनतेला घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.

तोच जोश, तोच उत्साह, तो क्षण पुन्हा अनुभवायचा आहे, पण आपल्या गडातून म्हणजे आपल्याच घरातून असं लिहत त्यांनी जनतेला घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
रायगड, 06 जून : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा होतोय. दरवर्षी या सोहळ्यासाठी लोखो शिवभक्त मोठ्या उत्साहात किल्ले रायगडार येतात. मात्र, यंदा कोरोना संसर्गचा प्रादूर्भाव सुरू असल्यामुळे अगदी काही मोजक्याच मावळ्यांसह युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. नुकत्याच झालेल्या "निसर्ग" चक्रिवादळाने रायगड जिल्ह्याला तडाखा दिला. त्यामुळे रायगड किल्यावर आणि पायथ्याशी असलेल्या गावांचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शिवराज्यभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षिततेची काळजी घेत साजरा केला जात आहे. यंदा लाखो शिवभक्तांना किल्ले रायगडवर जाता न आल्यामुळे काहीशी निराशा असली तरी समाजमाध्यमांवर मात्र आपल्या रयतेच्या राजाला सर्वजण मानाचा मुजरा करताना दिसत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वांना 347 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली अशी फेसबुक पोस्टही त्यांनी केली आहे. सोबतच 'छत्रपती शिवाजी महाराज मनामनात,शिवराज्याभिषेक घराघरात' असा नाराही त्यांनी दिला आहे. तोच जोश, तोच उत्साह, तो क्षण पुन्हा अनुभवायचा आहे, पण आपल्या गडातून म्हणजे आपल्याच घरातून असं लिहत त्यांनी जनतेला घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या गडातून म्हणजे आपल्याच घरातून साजरा करा सोहळा 'शिवराज्याभिषेक सोहळ्याची दरवर्षीची रायगडावरील लगबग तुम्ही सर्वजण सकाळी पाहण्यासाठी आतुर असाल म्हणूनच सकाळी 9 वाजता गतवर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा दाखवला जाणार आहे. मी समजू शकतो मी केलेल्या आवाहनाला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला आहे. सध्या दोन दिवस कोकणात चक्रीवादळाने थैमान घातलं असून रायगड जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे. मोबाईल टॉवरसुद्धा पडले आहेत. परिसरात रेंज कमी प्रमाणात असल्याने तुम्हाला सोहळा दाखवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत.' असं संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा 'छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ‘प्रजा सुखी तरच राजा सुखी’ या न्यायाने राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण केली. राजनिती, युद्धनिती, अर्थकारण, मानवतावाद, पर्यावरणसंवर्धन कुशलतेसह, भविष्याचा वेध घेण्याचे द्रष्टेपण असलेले ते राजे होते. त्यांनी गाजवलेले शौर्य, केलेला पराक्रम, घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करीत राहील' अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना त्रिवार वंदन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. त्यांच्यासारखा महामानव एकदाच जन्म घेतो आणि अखिल मानवजातीचे कल्याण करुन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात केलेले कार्य अलौकिक आहे. त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जागवली. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना, अठरापगड जातींना एकत्र करुन त्यांच्या मनात, स्वाभिमानाचे, स्वराज्याचे बीज रुजवले. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आपले वाटेल, जिथे सर्वांना न्याय मिळेल असे स्वराज्य निर्माण केले. शेतकऱ्यांना न्याय दिला. कष्टकऱ्यांना स्वाभिमान दिला. शिवराज्याभिषेकाने महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. त्यांच्यासारखा राजा मिळाला म्हणूनच शिवराज्याभिषेक दिनाचे आपल्या जीवनात सर्वाधिक महत्व आहे असेही अजित पवार म्हणाले. संपादन - रेणुका धायबर
First published:

Tags: Shivaji maharaj

पुढील बातम्या