मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune Bypoll Results: कसब्यात कोमेजलं कमळ; भाजपच्या पराभवामागे 'ही' आहेत प्रमुख कारणं

Pune Bypoll Results: कसब्यात कोमेजलं कमळ; भाजपच्या पराभवामागे 'ही' आहेत प्रमुख कारणं

कसब्यात कोमेजलं कमळ

कसब्यात कोमेजलं कमळ

एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा पेठ मतदारसंघ हा अचानक काँग्रेसनं कसा काय मिळवला? नेमकी समीकरणं बदलली कुठे? ही आहेत काही प्रमुख कारणं.

मुंबई, 02 मार्च: पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी झाले आहे. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरूवात झाल. पोस्टल मतदानामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. मतमोजणीपासून धंगेकर यांनी आता 11 हजार 40 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. पण एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा पेठ मतदारसंघ हा अचानक काँग्रेसनं कसा काय मिळवला? नेमकी समीकरणं बदलली कुठे? ही आहेत काही प्रमुख कारणं.

कसबा पेठ हा आतापर्यंत भाजपचा बालेकिला मानला जात होता. या सर्व भागात ब्राह्मण मतदार हा भाजपला मतदान करत होता. तसंच या भागात सर्वाधिक लोकसंख्या ही मागासवर्गीय मतदारांची होती. तरीही भाजपनं सतत या भागात ब्राह्मण उमेदवार दिला होता. माजी दिवंगत आमदार मुक्त टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक लागली. मात्र यंदा भाजपनं इथे ब्राह्मण उमेदवार दिला नाही. तसंच मुक्त टिळक यांच्या घराण्यातूनही कोणाला उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे कुठे तरी कसब्यातील ब्राह्मण मतदार नाराज होते की काय अशी चर्चा होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाला.

Pune Bypoll election Results : काँग्रेसने भाजप 'को पटक दिया', कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी

भाजपनं प्रचारासाठी खासदार गिरीश बापट यांना उतरवलं होतं. पण गिरीश बापट हे आजारी असल्यामुळे अक्षरशः आजरी अवस्थेत प्रचारसभेला उपस्थित राहिले होते. कदाचित हे मतदारांना आवडलं नसावं.

भाजपनं कसबापेठ निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड मोठी फिल्डिंग लावली होती. अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पुण्याला भेट देऊन काही प्रमाणात प्रचाराचेच संकेत दिले होते. मात्र सर्व जोर लावूनही नाराज मतदारांना आपल्याकडे ओढुन घेण्यात भाजपला यश आलं नाही.

रवींद्र धंगेकर यांना जरी काँग्रेसनं उमेदवारी दिली असली तरी धंगेकर हे अतिसामान्य समाज सेवक आहेत. लोकांमध्ये मिसळणारे आणि त्यांची कामं करणारे प्रतिनिधी आहेत असं कसबा पेठेतील मतदार सांगतात. अगदी गणेश मंडळापासून धंगेकरांचे संबंध आहेत असंही लोक सांगतात. त्यामुळे धंगेकरांना ग्राउंड सपोर्ट मिळाला आणि ते जिंकून आलेत.

तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पासून हिरावून घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली यामुळेही अनेक मतदार नाराज असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मतदारांनी त्यांची नाराजी भाजपच्या विरुद्ध मतदान करून दाखवून दिली असंच म्हणावं लागेल.

Pune Bypoll election Results : शिंदे गट, मनसे अन् मंत्र्यांची फौज हरली, धंगेकरांनी भाजपला चारली धूळ

कसब्यातील मुख्य लढत ही प्रामुख्यानं भाजप आणि महाविकास आघाडीतील नसून ही लढत भात आणि रवींद्र धंगेकर यांच्यातीलच होती असं म्हणावं लागेल. कारण भाजपने निवडणुकीआधी पैसे वाटल्याचे आरोप करण्यात आले होते. हा मुद्दा धंगेकरांनी उचलून धरला होता. यामुळेही कुठे तरी भाजपवर मतदार नाराज होता अशी शक्यता नाकारण्यात येत नाही.

एकूणच काय तर धंगेकरांनी भाजपला धक्का देत विधानसभेत महाविकास आघाडीचा एक आमदार वाढवला आहे. आता भाजप यावर निश्चित आत्मचिंतन करेलच पण मतदार हाच राजा असतो हे या निवडणुकीच्या निकालांमधून स्पष्ट झालं आहे.

First published:
top videos

    Tags: Pune, Pune Bypoll Election