जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune Bypoll Results: कसब्याच्या लढाईत अपक्ष म्हणून उतरलेल्या बिचूकलेंना आतापर्यंत किती मतं? बघा आकडेवारी

Pune Bypoll Results: कसब्याच्या लढाईत अपक्ष म्हणून उतरलेल्या बिचूकलेंना आतापर्यंत किती मतं? बघा आकडेवारी

बिचूकलेंना आतापर्यंत किती मतं? बघा आकडेवारी

बिचूकलेंना आतापर्यंत किती मतं? बघा आकडेवारी

यंदा या पोट निवडणुकांमध्ये नशीब आजमावण्यासाठी राजकारणी म्हणवणारे बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेही मैदानात उतरले आहेत. पण बिचुकले आतापर्यंत मतं मिळाली तर किती?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 02 मार्च: महाराष्ट्रात सध्या पुन्हा निवडणूक आणि निवडणुकीच्या निकालांचं वारं सुरु आहे. पुण्यातील दोन जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या दोन्ही जागांवर म्हणजे कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये सया मतमोजणी सुरु आहे. यंदा या पोट निवडणुकांमध्ये नशीब आजमावण्यासाठी राजकारणी म्हणवणारे बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेही मैदानात उतरले आहेत. पण बिचुकले आतापर्यंत मतं मिळाली तर किती? कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागांसाठी रविवार 26 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने यांचा सामना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी होता. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना रिंगणात उतरवलं. अपक्ष म्हणून राहुल कलाटेही रिंगणात उतरले होते. आमदारपदी निवड झाल्याबद्दल अश्विनी जगताप यांचे अभिनंदन’; निकालापूर्वीच कार्यकर्त्यांचं गुडघ्याला बाशिंग तसंच कसब्यातून आनंद दवेआणि अभिजित बिचुकले हेही अपक्ष म्हणून उतरले होते. तर अभिजित बिचुकले यांना आतापर्यंतच्या निकालांमध्ये अवघी 4 मतं मिळाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि महाविकास आघाडी याना डावलून लोकांनी मला निवडून द्यावं मी विकास करेन असं म्हणणाऱ्या बिचूकलेंना काही मतं मिळणंही अवघड झालं आहे. पत्रकारांशी घातला होता वाद काही दिवसापूर्वी निवडणुकीचा प्रचार सुरु असताना अहिजीत बिचुकले यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले होते. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं न देता अभिजित बिचूकलेंनी पत्रकारांवरच आरोप करत त्यांच्याशी वाद घातला होता या सर्व प्रकारचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. अभिजित बिचूकलेंना मात्र मतदारांनी कौल दिला नाही हे या निकलनावरून स्पष्ट होत आहे.

नेहमीच करतात वादग्रस्त वक्तव्य अभिजित बिचुकले हे नेहमीच महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असतात. माझ्या पत्नीला निवडून द्या असं काही दिवसांपूर्वी अभिजित बिचुकले यांनी म्हंटलं होतं. तसंच कसब्याच्या निवडणुकीत भाजप आणि अविकास आघाडीमध्ये काटे की टक्कर असतानाही बिचुकले हे निवडुकीच्या रिंगणात उतरले. मात्र मतदार राजा काही त्यांच्यावर विश्वास ठेऊ इच्छित नाही हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. आता थेट 2024 लक्ष्य “मला 4 मतं मिळाली असली तरी कसबा पेठ निवडणुकीत बराच गोंधळ झाला आहे. मला जनतेचा विकास करायचा आहे. आता माझं लक्ष्य हे 2024 च्या निवडणुकांवर आहे.” असं अभिजित बिचुकले यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हंटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात