जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / 'आमदारपदी निवड झाल्याबद्दल अश्विनी जगताप यांचे अभिनंदन'; निकालापूर्वीच कार्यकर्त्यांचं गुडघ्याला बाशिंग

'आमदारपदी निवड झाल्याबद्दल अश्विनी जगताप यांचे अभिनंदन'; निकालापूर्वीच कार्यकर्त्यांचं गुडघ्याला बाशिंग

'आमदारपदी निवड झाल्याबद्दल अश्विनी जगताप यांचे अभिनंदन'; निकालापूर्वीच कार्यकर्त्यांचं गुडघ्याला बाशिंग

पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाच्या आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे पोस्टर झळकवल्याचं पहायला मिळतं आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 1 मार्च : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक आरोप-प्रत्यारोपामुळे चांगलीच चर्चेत आली. रविवारी दोन्ही पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार न घेतल्यानं चिंचवडमध्ये तिरंगी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र निकाल लागण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचं चित्र चिंचवड मतदारसंघात दिसून येत आहे. द्रुतगती मार्गावर पोस्टर   पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाच्या आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे फलक झळकवल्याचं पहायला मिळतं आहे. चिंचवड मतदारसंघात भाजप उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होती. त्यामुळे निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. उद्या या पोटनिवडणुकीचा निकाल आहे. मात्र त्यापूर्वीच चिंचवडमध्ये मध्यरात्री द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाली अशा अशयाचे फलक लावण्यात आले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

उद्या निकाल  पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले आहे. कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर असा थेट सामना आहे. तर चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे. उद्या या पोटनिवडणुकीचा निकाल आहे. मात्र त्याचपूर्वी आमदार म्हणून अश्विनी जगताप यांचे पोस्टर लावण्यात आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात