पुणे, 24 मे : जर तुम्ही लॉकडाऊन असलेल्या राज्यात आहात, आणि तुम्हाला मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याची इच्छा पूर्ण करायची असेल तर जरा थांबा…कारण पुण्यातील पिपंरी-चिंचवड येथे 13 मुलांना लॉकडाऊनमध्ये क्रिकेट खेळणं महागात पडलं आहे. हिंजेवाडी येथील ब्लू रीच सोसयटीतील नवले क्रिक्रेट अकॅडमीमध्ये रविवारी सकाळी 13 मुलं किक्रेट खेळत होते. ही सर्व मुलं अल्पवयीन होती. पोलीस रविवारी सकाळी 8 वाजता पेट्रोंलिंग करीत होते. यादरम्यान त्यांना या अकॅडमीमध्ये मुले क्रिकेट खेळत असतानाचा आवाज आला. हे लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन आहे. महत्त्वाचं म्हणजे यापैकी एकाही मुलाने मास्क लावला नव्हता. सोशल डिस्टन्सिंगचे पालनही केले नव्हते. हे ही वाचा- पुणे: हॉटेल चालकाकडून नियमांचं उल्लंघन, शहरात कारवाईची जोरदार चर्चा त्यानंतर मात्र पोलिसांनी कारवाई करीत सर्व 13 मुलांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं. येथे त्यांची कौन्स्लिंग करण्यात आली. असं करून ते कुटुंबातील इतर सदस्यांना धोक्यात घातल असल्याचं सांगितलं. सर्व 13 मुलांना माफी मागितली. यानंतर पोलिसांनी 13 मुलांकडून 500-500 रुपयांचा दंड वसूल केला. ज्या नवल अकॅडमीमध्ये ते क्रिकेट खेळत होते, त्यांच्याकडूनही 5000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे पोलिसांनी एकून 11,500 रुपयांचा दंड वसूल केला. सोबतच अकॅडमीला सावध केलं. दरम्यान तौक्ते चक्रीवादळामुळे (cyclone tauktae) राज्यात उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती आली. जून महिन्यात आता मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यामुळे वातावरणात आतापासूनच बदल जाणवू लागले आहे. पुण्यात (Pune) आज संध्याकाळच्या सुमारास हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच बुधवारपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.