संतापजनक! पिंपरीत सख्ख्या भावाने केला बलात्कार; बहीण गरोदर राहिल्यानंतर उघड झाला प्रकार

संतापजनक! पिंपरीत सख्ख्या भावाने केला बलात्कार; बहीण गरोदर राहिल्यानंतर उघड झाला प्रकार

बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रात्री आसपास कोणी नाही हे पाहून सख्या भावानेच बहिणीवर बळजबरी करत बलात्कार केला.

  • Share this:

पिंपरी, 16 जून: पिंपरी चिंचवडच्या बिजलीनगर (Bijali Nagar Pimpri Chinchwad) परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबात बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासणारा अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला आहे. 21 वर्षाच्या सख्ख्या भावाने लहान्या बहिणीवर बळजबरी करत बलात्कार (brother raped on sister) केला आणि या प्रकरणाची वाच्यता न करण्याची धमकीही तिला दिली. बलात्कारानंतर पीडित मुलगी 5 आठवड्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात चिंचवड पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून 21 वर्षाच्या आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने (Pune Sessions Court) सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, हे बहिण भाऊ 15 मे च्या रात्री बिजलीनगर येथे भाड्याने राहत असलेल्या घरात हॉलमध्ये झोपलेले होते. त्यावेळी रात्री आसपास कोणी नाही हे पाहून सख्या भावानेच बहिणीवर बळजबरी करत बलात्कार केला. हे संपूर्ण कुटुंब नांदेडचे रहिवासी असून पोट भरण्याकरता चिंचवड येथे भाड्याने घर घेऊन राहत आहेत.

सहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब

या सगळ्या प्रकारानंतर पोलीस आणि न्यायालयातील कर्मचारी सुद्धा हा प्रकार ऐकल्यानंतर संतापले. बहिणीने ही या गल्लीच्छ प्रकाराची वाच्यता केल्याने आपली आणि पर्यायाने कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने घरी काही सांगितलं नाही. मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्याने तिला त्रास सुरू झाला आणि हा सगळा प्रकार तिच्या आईच्या लक्षात आला. त्यानंतर आईने चौकशी केल्यावर हा घृणास्पद प्रकार तिने आईला सांगितला.

दरम्यान या सगळ्या प्रकाराची माहिती मिळाल्यावर तिचा नराधम भाऊ घरातून निघून गेला होता. या सगळ्या प्रकाराची तक्रार चिंचवड पोलिसांकडे केल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बहिण भावाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या आरोपीला तातडीने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Published by: Sunil Desale
First published: June 16, 2021, 6:26 PM IST

ताज्या बातम्या