Home /News /pune /

सहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब

सहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब

Murder in Pune: सहलीला गेलेल्या एका परिवारातील दोन जणांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मायलेकराची हत्या (Son and mother murder) करून त्यांचा मृत दोन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिला आहे.

    पुणे, 16 जून: सहलीला गेलेल्या एका परिवारातील दोन जणांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मायलेकराची हत्या (Son and mother murder) करून त्यांचा मृत दोन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिला आहे. एकाच दिवशी मायलेकराची हत्या झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. दोन्ही मृतदेहांची ओळख पटली असून महिलेच्या पतीचा शोध घेतला जात आहे. मंगळवारी सायंकाळी नवीन कात्रज बोगद्याजवळ एका सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळला होता. मुलाची गळा आवळून हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. यानंतर काही तासांतच सासवड याठिकाणी आईचा देखील मृतदेह आढळला आहे. आईच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली आहे. आयान शेख (वय-6) आणि आलिया आबिद शेख (वय-35) असं हत्या झालेल्या मायलेकरांची नावं आहेत. यांची हत्या नेमकी कोणी केली आणि कोणत्या कारणासाठी झाली, याची अद्याप पुष्टी झाली नाही. पण या परिवारानं सहलीला घेऊन गेलेली कार पुणे सातारा रोडवरील एका चित्रपटगृहासमोर आढळली आहे. मंगळवारी नवीन कात्रजच्या बोगद्याजवळ सहा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून भारती विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याची गळा आवळून हत्या केल्याची निष्पन्न झालं होतं. दरम्यान मुलाचे नातेवाईक मुलाचा शोध घेत असल्यानं मुलाची त्वरित ओळख पटली. त्यानंतर काही तासांतच पुरंदर तालुक्यातील खळद याठिकाणी आईचाही मृतदेह सापडला आहे. याचा तपास सासवड पोलीस करत आहेत. याप्रकरणी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे ही वाचा-आई ओरडली म्हणून मुलीनं घर सोडलं; आसरा देण्याच्या बहाण्यानं 6जणांनी केला बलात्कार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आलिया यांचे पती आबिद शेख पुण्यातील एका कंपनीत ब्रॅंच मॅनेजर म्हणून काम करतात. तीन दिवसांपूर्वी ते झूम कार घेऊन आपल्या परिवारासोबत सहलीला गेले होते. यातली मुलगा आणि आईचा मृतदेह आढळला आहे. पण अद्याप आबिद यांचा काहीही थांगपत्ता लागत नाही. आबिद यांचा फोनही बंद लागत आहे. त्यामुळे सहलीसाठी गेलेल्या संबंधित परिवारासोबत नेमकं काय घडलं, याचं गूढ बनलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder Mystery, Pune

    पुढील बातम्या