मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते पण अंतिम निर्णय हे आमचे वरिष्ठ नेतेच घेणार, चंद्रकांत पाटील यांची पुण्यात माहिती

मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते पण अंतिम निर्णय हे आमचे वरिष्ठ नेतेच घेणार, चंद्रकांत पाटील यांची पुण्यात माहिती

'...म्हणून माजी मंत्री म्हणू नका म्हणालो', 48 तासांची मुदत संपताच चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

'...म्हणून माजी मंत्री म्हणू नका म्हणालो', 48 तासांची मुदत संपताच चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

chandrakant patil On mns alliance : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे.

पुणे, 02 ऑगस्ट: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांची नुकतीच पुण्यात (Pune) पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे. भविष्यात युती (mns alliance) होऊ शकते पण अंतिम निर्णय हे आमचे वरिष्ठ नेतेच घेणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

मनसेसोबत युती करण्यावर केंद्रातील नेतेच निर्णय घेतील असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ऐकल्या पूरग्रस्त सांगलीकरांच्या व्यथा

परप्रांतीय संबंधीच्या भूमिकेवरून मनसेसोबतचे गैरसमज दूर झाले. तर भविष्यात युती होऊ शकते पण अंतिम निर्णय हे आमचे वरिष्ठ नेतेच घेणार असं सांगत मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट मत मांडलं आहे.

मला क्लीप मिळाली आहे. हे वास्तव आहे. मग ती कोणी पाठवली याला काहीही अर्थ उरत नाही आणि हो माझ्यात आणि राज ठाकरे यांच्यात युतीबाबत कोणतीही चर्चा सुरू झाली नाही. जे काही बोलणं झालंय ते परप्रांतीय मुद्द्यावर. या मुद्दावरील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न असल्याचं, चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Chandrakant patil, MNS, Pune, Raj Thackeray (Politician)