सरकार तुम्हाला आपत्तीमधून बाहेर काढेल माझ्याकडे सर्व रिपोर्ट आले आहेत. मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे. तुम्हाला वचन द्यायला आलो आहे. तुमच्यावर आपत्ती ओढवली. त्यातून तुम्हाला पुन्हा उभं करण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आहे. त्यातून मी तुम्हाला बाहेर काढेन, असं म्हणत मात्र तुम्ही ज्या पद्धतीने गर्दी केली ते भयानक आहे. कारण कोरोना अजून गेला नाही. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणाऱ्या जिल्ह्यात सांगली आहे. त्यामुळे कोरोना होणार नाही याची काळजी घ्या, असं मुख्यमंत्री म्हणालेत.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अंकलखोप येथे पूरग्रस्तांशी संवाद साधला;
आपत्तीनंतर तुम्हाला पायावर उभं करायची जबाबदारी आमची आहे. ही अतीवृष्टी होण्याआधीपासूनच या संपूर्ण भागात कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. कृपा करून गर्दी करू नका. मास्क घालत राहा. — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2021
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्या व्यथा आणि वेदना आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमच्यासोबत आहे. तुमच्यासाठी जे जे करणं शक्य आहे. ते ते आम्ही करू. भिलवडीकरांना आश्वासन संकट आलं की पॅकेज जाहीर केली जातात. ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. एवढ्या हजार कोटीचं पॅकेज. कुठे जातं कुणालाच माहीत नाही. मला अशी थोतांड येत नाही. मला खोटं बोलता येत नाही जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं जाईल. ते केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी भिलवडीतल्या पूरग्रस्तांना दिली. धक्कादायक! महाराष्ट्रात चार तासात अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून गँगरेप कठोर निर्णय घ्यावे लागतील- मुख्यमंत्री काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतील, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. काही ठिकाणी पुनर्वसन करावं लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र त्यासाठी तुमच्या सर्वांची तयारी असली पाहिजे. पाण्याच्या पातळ्या मोजण्यासाठी आपलं आयुष्य नाही आहे. सरकार तुमच्या हिताचे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढं वचन मी तुम्हाला देतो, असं मुख्यमंत्री भिलवडीतील पूरग्रस्तांना म्हणाले.पूर दरवर्षी येतोय, दरवर्षी मुख्यमंत्री, मंत्री येणार आणि चौकशी करून जाणार. असेच आयुष्य जगायचे का? अतिवृष्टीचा इशारा येताच प्रशासनाने या भागातील लोकांचे लगेच स्थलांतर केले, जीव जाऊ दिले नाहीत. हे आपलं सरकार आहे. तुमची सर्वांची ताकद आहे. तुमच्या हिताचेच निर्णय घेणार.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.