मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune Ambil Odha: पुण्यातील आंबिल ओढावासीय पुन्हा संकटात, तोडकामाला दिलेली स्थगिती न्यायालयाने उठवली

Pune Ambil Odha: पुण्यातील आंबिल ओढावासीय पुन्हा संकटात, तोडकामाला दिलेली स्थगिती न्यायालयाने उठवली

पुण्यातील आंबिल ओढा नागरिकांवर पुन्हा एकदा संकट ओढावलं आहे.

पुण्यातील आंबिल ओढा नागरिकांवर पुन्हा एकदा संकट ओढावलं आहे.

पुण्यातील आंबिल ओढा नागरिकांवर पुन्हा एकदा संकट ओढावलं आहे.

पुणे, 21 ऑगस्ट : पुण्यातील आंबिल ओढा (Amil Odha Pune) येथील नागरिक पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या तोडकामाला दिलेली स्थगिती न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे आता पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) पुन्हा आंबिल ओढा येथील नागरिकांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची शक्यता आहे. एकूणच या प्रकारामुळे आंबिल ओढा येथील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणी वरच्या कोर्टात दात मागण्याचा निर्णय आंबिल ओढावासीयांनी घेतला आहे. तोडकामाला दिली होती स्थगिती पुणे शहरातील आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर पुणे महानगरपालिकेकडून या ठिकाणची अतिक्रमण झालेली घरे तोडण्याची कारवाई भर पावसात सुरू करण्यात आली. भर पावसात करण्यात येत असलेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला आणि त्यांनी या कारवाईला विरोध केला. याचे पडसाद राजकीय वर्तुळात सुद्धा उमटले. त्यानंतर घरे पाडण्याच्या कारवाईला आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती देण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. 'भाजपची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली', शिवसेनेची टीका आंबिल ओढ्यातील रहिवाशांना कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांची घरे पाडण्याची कारवाई होत आहे ती तात्काळ थांबवावी. तसेच ऐन पावसाळ्यात त्यांना बेघर करु नये, त्यासाठी पर्यायी व्यवस्था करुन बाधितांना कायमची घरे देण्यात यावी अशा सूचना सुद्धा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिल्या होत्या. न्यायालयाने सुद्धा दिली होती स्थगिती आंबिल ओढा परिसरात असलेल्या अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर हा वाद न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने सुद्धा या प्रकरणी स्थानिकांची बाजू घेत तुर्तास तोडकामाला स्थगिती दिली होती. पण आता न्यायालयाने ही स्थगिती उठवल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या