मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'भाजपची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली', शिवसेनेची टीका

'भाजपची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली', शिवसेनेची टीका

शिवसेनेने सामनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेने सामनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेने सामनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 21 ऑगस्ट : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील (Pimpri Chinchwad Municipal Corporation) सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे (Nitin Landge) यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या मुद्द्यावरुन आता शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Shiv Sena mouthpiece Saamana) अग्रलेखातून भाजपवर (BJP) जोरदार टीका करण्यात आली आहे. पाहूयात काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात.

पिंपरी-चिंचवड मनपाच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या एजंटला लाच स्वीकारताना पकडले याला भाजपवाल्यांनी षडयंत्र म्हणणे म्हणजे भ्रष्टाचाराची व्याख्याच बदलण्यासारखे आहे. असे पैसे इतरांनी स्वीकारले तर तो भ्रष्टाचार आणि स्वत: पोलिसांच्या बेड्यांत अडकले तर तो षडयंत्राचा प्रकार. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस भ्रष्टाचाराचा अजगरी विळखा पडला आहे तो सोडवावाच लागेल.

Pimpri-Chinchwad : लाच प्रकरणात सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष ACB च्या जाळ्यात

सामनाच्या अग्रलेखात पुडे म्हटलं आहे, भारतीय जनता पक्षाची अवस्था म्हणजे सध्या मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशा प्रकारची झाली आहे. या पक्षाला मिळेल त्या मार्गाने पैसे कमविण्याचे म्हणजे भ्रष्टाचाराचे वावडे कधीच नव्हते. हेच लोक सध्या उठसूट मुंबई मनपावर निशाणा साधत असतात पण स्वत:च्या खुर्चीखाली काय जळते आहे त्याचा मात्र त्यांना सोयिस्कर विसर पडतो. एखाद्या शहराची पुरती इज्जत काढणे म्हणजे काय? ते कालपरवा पिंपरी-चिंचवड मनपात घडले. या मनपावर सध्या भाजपचा झेंडा आहे.

घाऊक पक्षांतरे घडवून पिंपरी चिंचवडची मनपा भाजपने जिंकली. त्यामुळे तिजोरीच्या चाव्या या जुन्याच मालदार, वतनदारांकडे राहिल्या. एकेकाळी आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणून पिंपरी-चिंचवड नगरपालिकेचे नाव घेतले जात होते. जशी श्रीमंतीची चर्चा तसा येथील भ्रष्टाचाराचाही बोलबाला झाला. विकास कामांच्या नावाखाली गेल्या काही वर्षांत ठेकेदारांनी महानगरपालिकेची लूट केली आहे. पण या भ्रष्टाचारावर कुणी बोलायचे नाही कारण येथे भाजपचा पारदर्शक वगैरे कारभार सुरू आहे असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

First published:

Tags: BJP, Pimpri chinchavad, Shiv sena