मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देऊन पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देऊन पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एक दिवस त्याने तिला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवलं आणि वाघोली परिसरात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

एक दिवस त्याने तिला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवलं आणि वाघोली परिसरात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

एक दिवस त्याने तिला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवलं आणि वाघोली परिसरात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पुणे 10 फेब्रुवारी : महाराष्ट्र महिलांवरच्या अत्यांच्याचारांच्या घटनांनी हादरुन गेलंय. त्यावरून राज्यभर संतापाचं वातावरण आहे. असं असतानाच आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. अ‍ॅसिड फेकायची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पवयीन मुलगी इंग्रजी माध्यमातल्या शाळेत शिकतेय. आरोपी हा तिच्या शाळेबाहेर उभा राहून रोज तिचा पाठलाग करत असे. त्याच बरोबर तो अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देत होता.

आरोपी हा मुलीला शाळेबाहेर गाठून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे. मात्र मुलगी प्रतिसाद देत नसल्याने तो तिला त्रास द्यायचा. एक दिवस त्याने तिला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवलं आणि वाघोली परिसरात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

त्याचा त्याने व्हिडीओही बनवला होता. त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करत असे. कुणाला सांगितलं तर कुटुंबीयांनाही ठार करेल अशी धमकीही त्याने दिली होती. या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने ही माहिती पालकांना सांगितली आणि पालकांनी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.

वर्षभरापूर्वी केली भाऊजीची हत्या, जामिनावरचा आरोपी उठला बहिणीच्या जीवावर

पिंपरीत सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या

महिलांवरील अत्याचाराचा कळस गाठणाऱ्या हिंगणघाट येथील घटनेबद्दल बोललं जातं असतांना पेशाने डॉक्टर असलेल्या पतीकडून सतत होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका 34 वर्षीय संगणक अभियंता महिलेने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दवी घटना घडल्याची बाब समोर येतीय पिंपरी शहरातील चिंचवड परिसरातल्या माणिक कॉलिनीतील पुष्पांगण अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. या घटनेत मेघा पाटील ह्यांचा मृत्यू झालाय.

हिंगणघाटमध्ये संतापाची लाट, आरोपीला ताब्यात देण्याची पीडितेच्या वडिलांची मागणी

मेघाच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारी नुसार मेघाचा पती आरोपी संतोष पाटील हा तिच्याकडे माहेरून 25 लाख रुपये आणण्यासाठी वारंवार तगादा लावत होता. शिवाय तिच्या दिसण्यावरूनही सतत तिचा मानसिक छळ करायचा ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून अखेर मेघाने आत्महत्या करण्याचं टोकाच पाऊल उचललं आणि तिचा दुर्दवी मृत्यू झाला.  दरम्यान ह्या घटने बाबत तक्रार दाखल होताच चिंचवड पोलिसांनी मेघाचा पतीसह सासू सासऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपी पती डॉक्टर संतोष पाटील याला अटक केली आहे.

First published: