मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वर्षभरापूर्वी केली भाऊजीची हत्या, जामिनावर सुटलेला आरोपी उठला बहिणीच्या जीवावर

वर्षभरापूर्वी केली भाऊजीची हत्या, जामिनावर सुटलेला आरोपी उठला बहिणीच्या जीवावर

प्रेम विवाहाच्या रागातून भावाने सख्या बहीणीच्या नवऱ्याची हत्या केली होती. आता बहिणीच्या जीवावरच तो उठलाय.

प्रेम विवाहाच्या रागातून भावाने सख्या बहीणीच्या नवऱ्याची हत्या केली होती. आता बहिणीच्या जीवावरच तो उठलाय.

प्रेम विवाहाच्या रागातून भावाने सख्या बहीणीच्या नवऱ्याची हत्या केली होती. आता बहिणीच्या जीवावरच तो उठलाय.

बीड 10 फेब्रुवारी : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सुमित वाघमारे हत्या कांडांतील पीडिता भाग्यश्री वाघमारेला केस मागे घेण्यासंबंधी धमक्या आणि दबाव टाकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जामीनावर सुटून आलेल्या आरोपींनी थेट केस मागे घ्या अन्यथा भाग्यश्री व सुमितच्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली. यामुळे पीडित कुटुंबाने पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करते वेळी पोलिसांनी तक्रार दाखल न करता उलट आरोपींना फोन लावून माहिती दिल्याचा आरोप भाग्यश्री वाघमारे हिने केला. यामुळे आरोपींचा मुजोरपणा आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यापूर्वी बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात भाग्यश्रीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी हा गंभीर प्रकार उघडकीस आला. आजही वाघमारे कुटुंब दहशतीखाली आहे. या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. मात्र केस साठी न्यायालयात गावाकडून बीडला येताना अपघात घडवून मारतील अशी भिती सुमितचे वडील शिवाजी वाघमारे आणि आई सुनीता वाघमारे यांनी व्यक्त केली.

हिंगणघाट जळीत हत्याकांड, काय घडलं होतं त्या दिवशी?

प्रेम विवाहाच्या रागातून सख्या बहीणीच्या नवरा असलेल्या सुमितचा दिवसा ढवळ्या बालाजी लांडगेसह काही आरोपींनी खून केला होता. या प्रकरणातील पीडिता भाग्यश्री वाघमारे आजही दहशतीत आहे. या प्रकरणाला एक वर्ष लोटले आहे. या गुन्ह्य़ातील दोन आरोपीं गजानन क्षिरसागर, आणि कृष्णा क्षिरसागर हे जामीनावर बाहेर आहेत. हे दोघे पीडित भाग्यश्री वाघमारे व कुटुंबावर दबाव टाकून केस मागे घ्या, पैसे कितीही मागा, पण केस मागे घ्या एवढ्यावर त्या कुटुंबाने एकले नाही म्हणून थेट कुटुंब संपवण्याची धमकी दिल्याचे मयत सुमित चे आईवडील सांगत आहेत.

तसेच सुमितच्या नातेवाईकांना त्रास देत असल्याचे समोर आले आहे. या आधी तारखेसाठी बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात जीवे मरण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. त्यानंतर हा प्रकार समोर आल्याने आरोपींची मुजोरी आणि दहशत दिसून येत आहे.

हिंगणघाटमध्ये संतापाची लाट, आरोपीला हवाली करण्याची पीडितेच्या वडिलांची मागणी

तुझ्यामुळे माझा मुलगा जेल मध्ये आहे. तु जर पुन्हा न्यायालयात तारखेला आलीस तर सुमितप्रमाणे तुला संपवून टाकु अशी धमकी दिल्याचे भाग्यश्री ने सांगितलें आहे. हिंगणघाटमधल्या पीडितेचा मृत्यू झालेला असतानाच ही घटना समोर आल्याने चिंता व्यक्त केली जातेय.

First published: