पुणे, 26 फेब्रुवारी : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नेतवड येथे अपघात झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मोटार सायकलवरून जात असताना कठडे नसलेल्या विहिरीत मोटारसायकल सह विहीरीत पडला. दरम्यान या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरी व्यक्ती पाईपाला धरून राहिल्याने त्याला जीवदान मिळाले आहे.
घटनास्थळी जुन्नर रेस्क्यू टीमचे जवान राजकुमार चव्हाण, रूपेश जगताप, संकेत कबाडी, मगदुम सय्यद, आदित्य आचार्य, कपिल कबाडी, तनिष गायकवाड, आतीफ सय्यद, अली नासेर यांनी रेस्क्यू करून दुचाकी व मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
तळेगावमध्ये असाच प्रकार
तळेगाव दाभाडे येथे एका दुचाकीस्वाराला भरधाव कारने मागील आठवड्यात उडवले. त्यात विशाल शेलार हा मोपेडस्वार गंभीर जखमी झाला. त्यानंतर कार चालक जखमी युवकाला रस्त्यावर टाकून पळून गेला. याप्रकरणी तळेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बाप जीव द्यायला निघाला, 13 वर्षांच्या लेकीनं पाहिलं आणि…, संभाजीनगरमधील घटनामात्र गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी विलंब केला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. परंतु हा अपघाताचा प्रकार एका सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आला आहे. जखमी मोपेडस्वार युवकाची प्रकुती गंभीर असून त्याच्यावर तळेगांव येथे खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.