Home /News /pune /

नियतीचा खेळ! पुण्यात कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गमावलं कुटुंब, कार विहिरीत कोसळून पत्नीसह दोन्ही मुलांचा मृत्यू

नियतीचा खेळ! पुण्यात कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गमावलं कुटुंब, कार विहिरीत कोसळून पत्नीसह दोन्ही मुलांचा मृत्यू

एकीकडे देशात प्राणीमात्रांवर निघृण अत्याचार केले जात असताना पुण्यात मात्र एका कुत्र्याला वाचवायला गेलेल्या कुटुंबावरच काळाचा घाला आला.

    पुणे, 11 जून : एकीकडे देशात प्राणीमात्रांवर निघृण अत्याचार केले जात असताना पुण्यात मात्र एका कुत्र्याला वाचवायला गेलेल्या कुटुंबावरच काळाचा घाला आला. पुण्याच्या हवेली तालुक्यातील अष्टपूरजवळ ही घटना घडली. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात या कुटुंबाची कार विहिरीत कोसळली. यात आईसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला. तर, पती या अपघातातून थोडक्यात बचावले. या अपघातात आई शितल कोतवाल, 9 वर्षीय मुलगी सृष्टी आणि 6 वर्षाच्या शौर्यचा मृत्यू झाला. तर, पती सचिन कोतवाल थोडक्यात बचावले. कोतवाल कुटुंबीय राहूवरून अष्टपूरच्या दिशेनं जात असताना, त्यांनी एक मधला रस्ता पकडला. या रस्त्याला लागूनच पाण्यानं भरलेले विहिर होती. रस्त्यात आलेल्या एका कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात संरक्षक कठडे नसलेल्या विहिरीत ही कार कोसळली. मंगळवारी रात्री 11.35 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. वाचा-क्या बात! लॉकडाऊनच्या काळात 83 टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर खूश कोतवाल दाम्पत्य हे राहूच्या सासरवाडीतून घरी येत असताना हा अपघात झाला. दरम्यान या अपघातात केवळ सचिन कोतवाल वाचले. त्यांनी गाडी विहिरीत पडताच बाहेर उडी मारली. त्यानंतर मुलांना आणि पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीच्या काचा बंद असल्यामुळं त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. सचिन कोतवाल बराचवेळ मदतीसाठी आवाज देत होते, मात्र आजूबाजूला वस्ती नसल्यामुळं त्यांना मदत मिळाली नाही. अखेर क्रेनच्या मदतीनं गाडी बाहेर काढण्यात आली. मात्र तोपर्यंत सचिन कोतवाल यांची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला होता. वाचा-पुण्यात मोठी कारवाई! साडे सात कोटींच्या बनावट नोटा जप्त, लष्करी अधिकाऱ्यासह 6 जण लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर म्हणाले की, या अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. सचिन यांनी रस्त्यावर बसलेल्या कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. “रस्ता गावच्या सीमेवर आहे. हा रुंद रस्ता नाही 8-9 फूटपेक्षा जास्त नाही. रस्त्याच्या डाव्या बाजूला एक कुत्रा बसलेला होता. पुढे जाण्याच्या प्रयत्नात सचिन यांनी आपली गाडी उजवीकडे वळवली. संरक्षक कठडे नसलेल्या विहिरीत गाडी कोसळली”,असे मानकर यांनी सांगितले. वाचा-टीव्हीवर कार्टून बघण्यास आईनं केला विरोध, पुण्यात 14 वर्षीय मुलानं घेतला गळफास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला आणि तिचा मुलगा मागील सीटवर बसले होते तर सचिन आणि त्यांनी मुलगी कारच्या पुढच्या सीटवर होती. ते विहिरीत पडले हे सचिनला त्वरित लक्षात आले नाही, असे मानकर यांनी सांगितले. संकलन, संपादन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Pune accident, Pune news

    पुढील बातम्या