पुणे, 19 जून : बावधन परिसरात पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीला पुन्हा एकदा तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं आहे. 4 महिन्यांच्या मुलीला एका दाम्पत्यानं निर्जन ठिकाणी उघड्यावर टाकून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पुण्यात उघडकीस आली होती. त्यानंतर पोलिसांनी या चिमुकलीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. अवघ्या 10 तासांत या मुलीच्या काकांचा शोध लावून त्यांनी तिली स्वाधीन केलं. आई मात्र अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. बावधन परिसरातील निर्जन ठिकाणी झाडाखाली कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत 4 महिन्याची चिमुकली सापडल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला. कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी पोहचल्यानंतर मुलीला ताब्यात घेतले. सध्या तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी या चिमुकलीची काळजीही घेतली. या चिमुकलीचा पोलिसांनाही लळा लागला एकीकडे कर्तव्य बजावत असताना पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन पाहायला मिळालं. हे वाचा- पुण्यात सामूहिक आत्महत्येनं खळबळ! दाम्पत्यानं दोन चिमुकल्यासह संपवलं आयुष्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरगुती वादातून दाम्पत्यानं या मुलीला उघड्यावर टाकून दिल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी अवघ्या 10 तासांत या चिमुकलीच्या काकांचा शोध घेऊन शुक्रवारी पाहाटे तिला त्यांच्या स्वाधीन केलं.मात्र आईचा अद्यापही शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावत असताना या चिमुकलीला प्रेमही दिलं आणि हरपलेलं पितृछत्रही परत मिळवून दिलं आहे. हे वाचा- पुण्यात खळबळ! टाऊन प्लॅनिंगमधील बड्या अधिकाऱ्यासह पत्नी आणि मुलांवर गुन्हा संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.