मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणे: भरदिवसा 24 वर्षीय कुख्यात गुन्हेगाराच्या डोक्यात गोळी घालून केली हत्या; परिसरात खळबळ

पुणे: भरदिवसा 24 वर्षीय कुख्यात गुन्हेगाराच्या डोक्यात गोळी घालून केली हत्या; परिसरात खळबळ

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या तालुक्यात 24 वर्षीय कुख्यात गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे.

पुणे, 1 ऑगस्ट : पुण्यातील (Pune) आंबेगाव तालुक्यात एकलहरे भागात एका 24 वर्षीय कुख्यात गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या तालुक्यात 24 वर्षीय कुख्यात गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेला तरुण सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पुढे येत आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एकलरे भागात ही हत्या करण्यात आली. (Pune : 24 year old criminal shot dead )

आज दुपारच्या वेळेत या कुख्यात गुन्हेगाराला थेट गोळीच घालण्यात आली. सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ राण्या बाणखिले असं हत्या झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याचा मंचर पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृत झालेला तरुण हा मंचर येथील एका हमालाच्या मृत्यू प्रकरणात आरोपी होता. या प्रकरणात अधिक तपास मंचर पोलीस अधिकारी व स्टाफ करत आहेत.

हे ही वाचा-2000 रुपयांची नोट घेऊन पोलीस गेले ग्राहक बनून; आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्या तरुणी

गेल्या काही दिवसात पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भर दिवसा या कुख्यात गुन्हेगाराची गोळी घालून हत्या करण्यात आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येमागे नेमकं कोण होतं, याबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

First published:

Tags: Murder, Pune crime news