फरीदाबाद, 1 ऑगस्ट : त्या दिवशी पोलीस हॉटेलांमध्ये तपास करीत होते. दरम्यान त्यांनी एका हॉटेलमध्ये छापेमारी केली. यावेळी तब्बल 36 तरुण-तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत सापडल्याचा धक्कादायक प्रकार फरीदाबाद येथून समोर आला आहे. पोलिसांनी या 36 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. यापूर्वी फरीदाबाद येथील निलम बाटा रोडवरच 44 जणांना अटक करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, फरीदाबाद पोलिसांनी रात्री उशिरा बालाजी हॉटेलमध्ये छापेमारी केली. यादरम्यान पोलिसांनी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत सापडले. यापूर्वी बुधवारी निलम बाटा रोडवरुन अर्बन हॉटेलव अँड रेस्तरॉमध्ये छापा मारला होता. यावेळीही अनेक तरुण-तरुणींना अटक करण्यात आलं. या तरुणांनी स्वत:ला पोलिसांपासून वाचविण्यासाठी एक खोलीत बंद करुन घेतलं होतं. (Raided a hotel 36 youths were found in an offensive condition in faridabad)
हे ही वाचा-कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिअंट' ठरणार महाघातक, 3 पैकी एकाचा होईल मृत्यूहॉटेलमधून सापडल्या दारूच्या बाटल्या
येथे एका व्यक्तीने आपल्या सदस्यांसाठी पार्टी ठेवली होती. त्यामुळे हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साधारण 10 वाजता त्यांनी एक टीप मिळाली होती. यानुसार हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याचं सांगितलं गेलं होतं. यानंतर तातडीने यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी हॉटेलवर रेड मारण्यासाठी पोलिसांच्या टीमचं गठण केलं. आणि दोन कर्मचारी खोटे ग्राहक बनून हॉटेलमध्ये पाठवले. यामुळे आरोपींनी रंगेहाथ पकडण्यात यश आलं. पोलीस ठाण्याच्या प्रमुखाने 2000 रुपयावर स्वत:ची स्वाक्षरी करून त्या पोलिसाकडे दिली जे हॉटेलात ग्राहक म्हणून जाणार होते.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.