पुणे, 19 मार्च : पुण्यातील चांदणी चौक परिसरात रस्त्यावरू बस १५ ते २० फूट खाली कोसळून अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. मुंबई ते बंगळुरू पुणे मार्गे जाणारी खासगी बस बावधन येथे मुख्य रस्त्यावरून जाताना खाली कोसळली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस बायपासवरून १५ फूट खाली कोसळली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडली. या बसमधून ३५ प्रवाशी प्रवास करत होते. यातील सहा जखमी झाले आहेत. त्यांना अपघातानंतर उपचारासाठी कोथरूड परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रेल्वेत तो निवांत झोपला होता अन् अचानक बॅगेतून निघाला धूर, सगळेच गोंधळले, अखेर…
मुंबईवरून बेंगलोरच्या दिशेने खाजगी बस जात होती. तेव्हा चांदणी चौकाच्या अलीकडे बावधन सीएनजी पेट्रोल पंपाच्या समोरची बाजूला अपघात झाला. हायवेवरून बस रस्त्याकडेला लावलेले बॅरिगेट्स तोडून सर्विस रोडवर पलटी झालेली होती. जखमींना उपचारासाठी चेलाराम हॉस्पिटल बावधन, सिंबोसिस हॉस्पिटल लवळे, व ससून हॉस्पिटल अशा तीन हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहे.
अपघातानंतर पाषाण अग्निशमन केंद्र अधिकारी शिवाजी मेमाणे,वाहन चालक रमेश रणदिवे, फायरमन जवान किसन तरपाडे , गजानन बालगरे , शशिकांत धनवटे, मदतनीस जवान संकेत घोगरे, सौरभ पारखी यांनी बचावकार्य केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident