मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रेल्वेत तो निवांत झोपला होता अन् अचानक बॅगेतून निघाला धूर, सगळेच गोंधळले, अखेर…

रेल्वेत तो निवांत झोपला होता अन् अचानक बॅगेतून निघाला धूर, सगळेच गोंधळले, अखेर…

धावत्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशाच्या बॅगने घेतला पेट

धावत्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशाच्या बॅगने घेतला पेट

कुशीनगर एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाच्या बॅगने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. मात्र तरूणाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

नितीन चांदूरकर, प्रतिनिधी, जळगाव, 19 मार्च : कुशीनगर एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाच्या बॅगने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. मात्र तरूणाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा श्‍वास सोडला. आज पहाटे ५:३० वाजेची लोकमान्य टिळक टर्मिनस येथुन गोरखपुरच्या दिशेने जाणारी कुशीनगर एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला. तिसऱ्या क्रमांकाच्या बोगीत एका प्रवाशाच्या बॅगने अचानक पेट घेतला. एका प्रवाशाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुशीनगर एक्सप्रेसमध्ये इंजिनपासून तिसर्‍या क्रमांकाच्या जनरल बोगीत नांदगाव ते न्यायडोंगरी रेल्वे स्थानका दरम्यान एका प्रवाशी बॅगने अचानक पेट घेतला. सदरचा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येताच डब्ब्यात एकच खळबळ उडाली. डब्ब्यात वरच्या बर्थवर असलेला प्रवासी झोपला होता. तेव्हा अचानक त्याच्या बॅगला आग लागली. त्याने आग लागलेली बॅग खाली फेकल्यावर ती खाली बसलेल्या अजय अशोक मगरे या युवकाच्या बाजुला पडली. तेव्हा अजयने पायाने आग विझविण्याच्या प्रयत्न केला. यामुळे अजय याच्या पायास किरकोळ इजा झाली.

Nagpur News: नागपुरातील वॉकर्स स्ट्रीटवर अवतरली 'ग्लॅमर गर्ल', पाहा Photos

प्रवाशांनी चैन पुलिंग करुन गाडी थांबवली  आणि त्यावेळी अजयने आग लागलेली बॅग गाडीतुन बाहेर फेकली. सुदैवाने पुढील होणारा मोठा अनर्थ टळला. दरम्यान आर. पी. एफ. यांनी बोगी चेक करुन एक्सप्रेस पाचोर्‍याच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर एक्सप्रेस सकाळी ७:४५ वाजता पाचोरा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर अजय मगरे यास रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात चाळीसगावचे ए. पी. आय. किसन राख यांनी अजय मगरे यांचेकडुन घटनाक्रम ऐकुन जबाब नोंदवला आहे.

First published:

Tags: Local18