मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यातील मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल; 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

पुण्यातील मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल; 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Pune Marathe jewellers Fraud: 5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी प्रणव मराठे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

Pune Marathe jewellers Fraud: 5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी प्रणव मराठे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

Pune Marathe jewellers Fraud: 5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी प्रणव मराठे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे, 13 ऑगस्ट: पुण्यातील (Pune) प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या ( Marathe jewellers ) प्रणव मराठेंना (Pranav Marathe) अटक करण्यात आली आहे. 5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी प्रणव मराठे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ठेवीदारांचे पैसे आकर्षक परतव्याच आमिष दाखवून गोळा केले. मात्र परत न दिल्याने ठेवीदारांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

मराठे ज्वेलर्स हे पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स आहे. ठेवीदारांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. मराठे ज्वेलर्सच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असं आमिष प्रणव मराठे यांनी गुंतवणूकदारांना दाखवलं आणि त्यांची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास केला असता 18 ठेवीदारांची तब्बल 5 कोटी 9 लाख 72 हजार 970 रुपयांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबईकरांनो! गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मोठी घोषणा

प्रणव मराठे यांनी तब्बल 5 कोटींची फसवणूक केल्यानं मराठे ज्वेलर्सचे माजी भागीदार प्रणव मराठे यांना अटक झाली आहे. पुण्यातील कोथरुड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 59 वर्षीय शुभांगी काटे असं फिर्याद दाखल केलेल्या महिलेचं नाव आहे.

एकूण 18 ठेवीदारांचे 5 कोटींहून अधिक रकमेची त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रणव मराठेंना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले. न्यायालयानं त्यांना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सर्व ठेवीदारांचे पैसे प्रणव मराठे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचं समोर आलं आहे. त्या आधारेच त्यांना अटक केली आहे.सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.

...म्हणून ग्रामपंचायतीनं गावभर वाटले कंडोम; पुण्यात कोरोनानंतर अन्य एका VIRUS ने वाढवली चिंता 

मराठे ज्वेलर्सकडून सोने, चांदी आणि मूळ रकमेवर जादा परतावा मिळेल असं आमिष नागरिकांना दाखवलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे या आमिषाची आहारी पडून नागरिकांनी त्यांच्याकडे पैसे गुंतवले होते. गुंतवणूक केल्यानंतर बरेच दिवस झाले. तरी देखील पैसे मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांनी याबाबत ज्वेलर्स व्यवस्थापनाकडे विचारणा केली. त्यावर कोणत्याही प्रकारची माहिती दिली नसल्याचं शुभांगी काटे यांनी सांगितलं. त्यानंतर काटे यांनी तक्रार दाखल केल्याचं समजतंय.

First published:

Tags: Pune, Pune crime