जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / बीडीडी चाळ पुनर्वसनाचे काम 10 दिवसात सुरु तर पोलिसांच्या घरांचा निर्णय येत्या 8 दिवसात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

बीडीडी चाळ पुनर्वसनाचे काम 10 दिवसात सुरु तर पोलिसांच्या घरांचा निर्णय येत्या 8 दिवसात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

बीडीडी चाळ पुनर्वसनाचे काम 10 दिवसात सुरु तर पोलिसांच्या घरांचा निर्णय येत्या 8 दिवसात,  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( housing minister jitendra awhad) यांनी मोठी घोषणा केली आहे. वाचा सविस्तर

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 ऑगस्ट: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( housing minister jitendra awhad) यांनी मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा बीडीडी चाळ पुनर्वसनासंदर्भातली आहे. 1 जानेवारी 2021 पर्यंत जे नागरिक नायगाव बीडीडी चाळत (BDD Chawl) राहत आहेत. ते सर्वजण सदनिका मिळण्यास पात्र असून अशा नागरिकांना 500 चौरस फुटांची सदनिका देण्यात येणार आहे. येत्या पुढील 10 दिवसात पहिल्या चार इमारतींचे काम सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा आव्हाड यांनी केली आहे. या पुनर्वसनासाठी सुमारे 400 लोकांचे स्थलांतर बॉम्बे डाईंग मिलमधील इमारतींमध्ये करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच ज्या लाभार्थींना तिथे जायचे नसल्यास त्यांना सरकारकडून 22 हजार रुपये प्रतिमाह भाडे देण्यात येईल, असं ते म्हणालेत.

जाहिरात

या पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात उर्वरित दोन सरकार निर्णय येत्या आठ दिवसात काढण्यात येणार असल्याचंही ते म्हणालेत. याव्यतिरिक्त पोलिसांच्या घरांबाबतही सकारात्मक निर्णय झाला असून पुढील 8 दिवसात त्याचाही सरकार निर्णय काढण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. …म्हणून ग्रामपंचायतीनं गावभर वाटले कंडोम; पुण्यात कोरोनानंतर अन्य एका VIRUS ने वाढवली चिंता   गुरुवारी नायगाव येथील ललित कला भवनला डॉ. आव्हाडांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सरकार कोणालाही बेघर करणार नाही. नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या निर्णयावर सरकार ठाम असल्याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. त्यामुळे कोणीही प्रकल्पात अडथळा आणू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात