मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Heat wave Maharashtra : ढगाळ वातावरण वादळाबरोबर जाणार! पुण्यासह मध्य महाराष्ट्रात 2 दिवसात बदलणार हवामान; विदर्भाला alert

Heat wave Maharashtra : ढगाळ वातावरण वादळाबरोबर जाणार! पुण्यासह मध्य महाराष्ट्रात 2 दिवसात बदलणार हवामान; विदर्भाला alert

Asani Cyclone चा परिणाम म्हणून पुणे परिसरात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पण उद्यापासून वातावरण बदलेल.

Asani Cyclone चा परिणाम म्हणून पुणे परिसरात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पण उद्यापासून वातावरण बदलेल.

Asani Cyclone चा परिणाम म्हणून पुणे परिसरात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पण उद्यापासून वातावरण बदलेल.

  • Published by:  Sandeep Shirguppe

पुणे, 11 मे : असनी चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील (Asani Cyclone affect on Maharashtra) कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भावर जाणवण्याची शक्यता आहे. या भागात  ढगाळ वातावरण असल्याने उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. यासोबतच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या परिसरातही असनी चक्रीवादळाचा परिणाम जाणवण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुणे परिसरात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे तर 11 मे ते 15 मे राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD alert) वर्तवण्यात आली आहे. विशेष करून विदर्भातील (heat wave vidarbh) काही जिल्ह्याना उष्णतेच्या तिव्र झळा बसणार आहेत (Heat wave Maharashtra)

कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. (Heat wave Maharashtra) तर मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता याचबरोबर उद्या 12 मेपासून उष्णता जाणवणार आहे.

हे ही वाचा : Cyclone Asani: असनी चक्रीवादळाने मार्ग बदलला, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम, कुठे बरसणार पाऊस?

विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेची लाट असणार आहे. राज्यावर असनी वादळाचा (Asani Cyclone) परिणाम होताना दिसत आहे. हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते की, चक्रीवादळ गेल्या सहा तासांपासून 12 किमी प्रतितास वेगाने पुढे जात आहे. बुधवारी सकाळी उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरामार्गे मध्य पश्चिमेकडील आंध्रप्रदेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर वादळ लगेचच आपला मार्ग बदलले आणि मछलीपटनम, नरसापूर, यनम, काकनीडा, टूनी आणि विशाखापट्टनम किनारपट्टीच्या दिशेने धडकेल.

पश्चिम बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे असनी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाने आता आपला मार्ग बदलला असून आंध्रप्रदेशच्या (Andhra Pradesh) दिशेने वाटचाल केली आहे. हवामान विभागाने आंध्रप्रदेशातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. याच दरम्यान या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांत जाणवणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

First published:

Tags: Cyclone, Heat, Maharashtra News, Wave, Weather, Weather forecast