महाराष्ट्रावर काय परिणाम? असनी चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील (Asani Cyclone affect on Maharashtra) कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागावर जाणवण्याची शक्यता आहे. या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. यासोबतच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या परिसरातही असनी चक्रीवादळाचा परिमाण जावण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.#WATCH | Andhra Pradesh: Heavy rain lashes the city of Visakhapatnam as #CycloneAsani approaches pic.twitter.com/7vTs4HkeUY
— ANI (@ANI) May 11, 2022
राज्यातील पुढील हवामानाचा अंदाज 11 मे कोकण - तुरळ कठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भ - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. वाचा : चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता, IMD कडून Alert जारी 12 मे कोकण - तुरळ कठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र - हवामान कोरडे राहण्याची शक्यता मराठवाडा - हवामान कोरडे राहण्याची शक्यता विदर्भ - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते की, चक्रीवादळ गेल्या सहा तासांपासून 12 किमी प्रतितास वेगाने पुढे जात आहे. बुधवारी सकाळी उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरामार्गे मध्य पश्चिमेकडील आंध्रप्रदेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर वादळ लगेचच आपला मार्ग बदलले आणि मछलीपटनम, नरसापूर, यनम, काकनीडा, टूनी आणि विशाखापट्टनम किनारपट्टीच्या दिशेने धडकेल.8 am, 11 May, असनी चक्री वादळाचा प्रभाव ... राज्यात कोकणात, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा काही भागात ढगाळ वातावरण... मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली.. तसेच कर्नाटका केरळ सुद्धा... pic.twitter.com/4YxM0T1UJV
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 11, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andhra pradesh, Cyclone, Maharashtra News