Violence Against Women : सरकार मूग गिळून गप्प, बलात्काराच्या संख्येत मोठी वाढ

देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात (Rape Cases )प्रचंड वाढ झाली असतानाच सरकार मात्र मूग गिळून शांत आहे. प्रशासनानं स्वतःच या गोष्टीची पुष्टी केली आहे.

देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात (Rape Cases )प्रचंड वाढ झाली असतानाच सरकार मात्र मूग गिळून शांत आहे. प्रशासनानं स्वतःच या गोष्टीची पुष्टी केली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली 13 फेब्रुवारी : जगात असे अनेक देश आहेत जिथे युद्ध आणि बंडखोरांच्या दहशतीमुळे सामान्य लोकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. पूर्व आफ्रिकी देश इथिओपियाचे नावही या देशांमध्ये समाविष्ट आहे. या देशाच्या उत्तरेकडील तिग्रे भागात स्त्रियांवरील अत्याचार सतत वाढत आहेत. महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत असल्याची प्रशासनानंही पुष्टी केली आहे. वास्तविक, या  प्रदेशावर तिग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट या स्थानिक पक्षाचे नियंत्रण आहे. येथे फेडरल आर्मी आणि तिग्रे बंडखोर यांच्यात गेल्या एक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. गुरुवारी एका ट्विटमध्ये इथिओपियाचे महिला मंत्री फिलसन अब्दुल्लाही म्हणाल्या की, आम्हाला तिग्रे यांच्या क्षेत्रातील वास्तविकतेबाबत आमच्या टास्कफोर्स टीमकडून अहवाल मिळाला आहे. दुर्दैवाने तिथे बलात्कार होत असून कुठलाही विचार न करता सर्रास हा गुन्हा केला जात आहे. सरकारनं पहिल्यांदा केली पुष्टी - या भागात लैंगिक शोषण (Rape Cases increased in Tigray Ethiopia) होत असल्याचा बातम्या नोव्हेंबरपासून समोर येत आहेत. याबद्दल अनेक पीडित, डॉक्टर आणि कामगारांनीही माहिती दिली आहे. मात्र, सरकारनं पहिल्यांदाच आता या गोष्टीची पुष्टी केली आहे. सरकारच्या इथियोपियाई मानवाधिकार आयोगाच्या (Ethiopian Human Rights Commission) म्हणण्यानुसार, मागील दोन महिन्यात तिग्रेमध्ये 108 बलात्काराच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. सैनिकांवरही लावण्यात आलेत आरोप - काही महिला अशाही आहेत, ज्यांनी बलात्काराचा आरोप संघीय सैनिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरही लावले आहेत. मात्र, या आरोपांची पुष्टी अद्याप झालेली नाही. मानवाधिकार आयोगाचं असं म्हणणं आहे, की अनेक बलात्काराच्या घटनांची नोंदच झालेली नाही. आयोगानं म्हटलं, की युद्धामुळं निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळं परिसरात लैंगिक भेदभाव वाढला आहे. काय आहे संघर्षाचं कारण - प्रादेशिक पक्ष टीपीएलएफ आणि इथिओपियातील केंद्र सरकार यांच्यात दीर्घकाळ तणाव आहे(Ethiopia Tigray Battle) . हा तणाव हेदेखील सध्या सुरू असलेल्या संघर्षाचे कारण आहे. पंतप्रधानांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुका तहकूब केल्या. टीपीएलएफने सरकारच्या या निर्णयाला बेकायदेशीर ठरवत म्हटलं आहे, की पंतप्रधान अबी अहमद यांच्याकडे बहुमत नाही. त्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात पंतप्रधानांनी टीपीएलएफविरूद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्यामागील कारण सांगण्यात आलं, की टीपीएलएफच्या सैनिकांनी मक्कल येथील लष्करी तळावर हल्ला केला आहे. अशा लढवय्यांची संख्या सुमारे अडीच लाख आहे. ज्यानंतर त्यांच्यात लढा सुरू झाला.
    Published by:Kiran Pharate
    First published: