पुणे, 16 जुलै : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide) प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट (Pune Police clean cheat) दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले होते आणि त्यानंतर राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पुण्यातील वानवडी पोलिसांना जबाब दिला असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आमच्यावर कुणाचाही दबाव नाहीये आणि आमचा कोणावरही आरोप नाही. त्यासोबतच पोलिसांच्या तपासानंतर संजय राठोड यांना क्लीन चिट देण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. या संदर्भातील अहवालही पुणे पोलिसांनी राज्य सरकारला सोपवला आहे.
Rain updates: मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी भरले; तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाने सुद्धा संजय राठोड यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप झाल्याने संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
राठोड यांचे मंत्रिमंडळात कमबॅक?
माजी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर आता संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे संजय राठोड हे राज्य मंत्रिमंडळात कमबॅक करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pooja Chavan, Pune, Sanjay rathod, Suicide case